Download App

रामदास कदमांनी दुसऱ्या मुलालाही ‘सेट’ केलं… CM शिंदेंकडून MPCB च्या अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई : शिवसेना नेते, माजी मंत्री रामदास कदम (Ramdas ) यांचे दुसरे चिरंजीव सिद्धेश कदम (Siddhesh Kadam) यांची महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड यांना सतत गैरहजर असल्याचे कारण देत हटविण्यात आले आहे. त्यानंतर त्यांच्या जागी कदम यांची नियुक्ती केली आहे. कदम या आधी युवा सेनेच्या कार्यकारिणीचे सदस्य होते. (Siddhesh Kadam appointed as Chairman of Maharashtra Pollution Control Board)

दुसऱ्या मुलालाही केले सेट :

दरम्यान, रामदास कदम यांचे पहिले चिरंजीव योगेश कदम हे सध्या खेड मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत रामदास कदम यांनी योगेश कदम यांना तिकीट मिळवून देण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. 2014 पर्यंत तिथून सुर्यकांत दळवी हे शिवसेनेचे आमदार होते. 1990 ते 2009 असे तब्बल पाचवेळा ते विधानसभेला निवडून आले होते. अशा दळवी यांना थांबवून ठाकरे यांनी कदम यांना तिकीट दिले होते. त्यात ते निवडूनही आले होते.

लोकसभा रणशिंग! मविआचे जिल्ह्यातील दक्षिण-उत्तर झाले फायनल?

त्यानंतर आता सिद्धेश कदम यांनी प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करवून घेत रामदास कदम यांनी दुसऱ्या मुलाच्याही राजकीय भवितव्याची सोय करुन ठेवल्याचे बोलले जात आहे. सिद्धेश कदम हे यापूर्वी युवासेनेत सक्रिय होते. ते कार्यकारिणीचे सदस्यही होते. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांची मुंबई शहर विभागीय संपर्क नेतेपदी नियुक्ती केली होती.

शिंदे गटाला ‘सुप्रीम’ धक्का! आमदार अपात्रतेचा निर्णय सुप्रीम कोर्टात होणार; 8 एप्रिलला पुढील सुनावणी

लोकसभेला संधी नाहीच?

सिद्धेश कदम यांना आगामी लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती. गजानन कीर्तिकर हे सध्या मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघातून खासदार आहेत. मात्र वयाच्या आणि तब्येतीच्या कारणास्तव ते आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. पण आता महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने कदम यांना लोकसभेला संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

follow us