Ahmednagar News of Vaidu Jat panchayat Boycott : गेल्या अनेक वर्षांपासून जात पंचायतींवर बंदी घालण्यात आल्यानंतर देखील अनेक समाजात अद्याप देखील या जात पंचायती अघोषित स्वरूपात कार्यरत असल्याचं अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये समोर आले आहे. यातून एक धक्कादायक प्रकार देखील समोर आल्याचं यावेळी पाहायाला मिळालं.
Medical Colleges : केंद्रसरकारची मोठी कारवाई, 40 वैद्यकीय महाविद्यालायांची मान्यता रद्द
जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये निपाणी वडगाव येथे एका वैदू कुटुंबाला जातपंचायतीने वाळीत टाकल्याचा प्रकार घडला आहे. वैदू समाजातील सुशिक्षित डॉ. चंदन लोखंडे गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील अनिष्ठ परंपरा विरोधात लढा देत आहेत, त्यामुळेच त्यांनी वाळीत टाकले आहे. अशी चर्चा या परिसरात आहे.
कुस्तीपटूंसाठी आंतरराष्ट्रीय कुस्ती परिषद आखाड्यात; भारतीय कुस्ती संघाला दिला बरखास्तीचा इशारा
त्यामुळे या चंदन लोखंडे यांना आपल्या भाच्याच्या लग्नाला देखील जाता आले नाही. कारण हे वाळीत टाकलेलं कुटुंब आपल्या बहिणीच्या मुलालाच्या लग्नाला गेल्यास जात पंचायत हे लग्न मोडेल आणि त्यांनी 12 लाखांचा दंग देखील भरावा लागेल. असं पत्रच या बहिणीने लिहिलं होत.
काय लिहिलं होतं या पत्रात?
चंदन लोखंडे यांच्या बहिणीने आपल्या भावाला पत्र लिहिले की, तू माझ्या मुलाच्या म्हणजे त्यांच्या भाच्याच्या लग्नाला येऊ नये. कारण तो लग्नाला आला तर जात पंचायत हे लग्न मोडेल आणि त्यांनी 12 लाखांचा दंग देखील भरावा लागेल. असं पत्रच या बहिणीने लिहिलं होत. विवाहाच्या अगोदरच त्यांनी हे पत्र लिहिल होतं.
त्याचबरोबर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर डॉ. चंदन लोखंडे याी सांगितले की, या अघोषित बहिष्कारामुळे त्यांच्या कुटुंबाला प्रचंड दहशतीखाली जगावे लागत आहे. तसेच जातितील लोक संपर्क ठेवत नसल्याने मुलांचे लग्न जमवणे देखील त्यांना अवघड झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या प्रकरणामुळे गेल्या अनेक वर्षांपासून जात पंचायतींवर बंदी घालण्यात आल्यानंतर देखील अनेक समाजात अद्याप देखील या जात पंचायती अघोषित स्वरूपात कार्यरत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.