Medical Colleges : केंद्रसरकारची मोठी कारवाई, 40 वैद्यकीय महाविद्यालायांची मान्यता रद्द

Medicle Colleges

Medical Colleges recognition canceled by Central Government : देशातील वैद्यकीय महाविद्यालायांवर केंद्र सरकारकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. सरकारने तब्बल 40 वैद्यकीय महाविद्यालायांची मान्यता रद्द केली आहे. त्याचबरोबर यामध्ये आणखी 150 वैद्यकीय महाविद्यालायांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या 150 वैद्यकीय महाविद्यालायांवर देखील कारवाईची टांगती तलवार आहे.

कुस्तीपटूंसाठी आंतरराष्ट्रीय कुस्ती परिषद आखाड्यात; भारतीय कुस्ती संघाला दिला बरखास्तीचा इशारा

या वैद्यकीय महाविद्यालायांमध्ये आणि तेथील व्यवस्थापनामध्ये त्रुटी आढळून आल्याने केंद्र सरकारने हे पाऊल उचललं आहे. नॅशनल मेडिकल कमिशनच्यी यूजी बोर्डाने ही तपासणी केली होती. त्यानंतर या वैद्यकीय महाविद्यालायांची मान्याता रद्द करण्यात आली. या वैद्यकीय महाविद्यालायांच्या सीसीटीव्ही कॅमेरे, आधार-लिंक्ड बायोमेट्रीक हजेरी आणि फॅकल्टी रोल यामध्ये या त्रुटी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली.

या वैद्यकीय महाविद्यालायांची मान्याता रद्द :

सरकारने तब्बल 40 वैद्यकीय महाविद्यालायांची मान्यता रद्द केली आहे. त्यामध्ये गुजरात, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू, पंजाब, आंध्र प्रदेश, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील 40 वैद्यकीय महाविद्यालायांचा समावेश आहे. तसेच आणखी 150 वैद्यकीय महाविद्यालायांचा चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्रुटी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते.

चाकरमान्यांना गुड न्यूज! गणेशोत्सवापर्यंत सिंगल लेनचे काम पूर्ण होणार; मंत्री रविंद्र चव्हाण यांची माहिती

या वैद्यकीय महाविद्यालायांना या कारवाई विरोधात दाद मागण्याचा अद्याप देखील पर्याय आहे. हे वैद्यकीय महाविद्यालये 30 दिवसांच्या आत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे अपील करू शकतात. तसेच या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांबद्दल अद्याप सरकारकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube