सांगली जिल्ह्यात दु:खद घटना घडली आहे. (Sangli) जत तालुक्यातील मोटेवाडी येथे भिंत अंगावर कोसळून सहा भाविक ठार झाले आहेत. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मोटेवाडी येथे मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमानिमित्ताने भाविक जमले होते, वादळी वारा सुटल्याने भाविकांनी बांधकाम सुरू असलेल्या भिंतीशेजारी आसरा घेतला होता.
काही वेळाने वाऱ्याचा वेग आणखी वाढला, त्यामुळे शेजारील पत्र्याचं शेड उडून या भिंतीवर आदळले, कच्चा अवस्थेतील भिंत कोसळली आणि भिंतीखाली अनेकजण दबले गेले. या घटनेत 6 भाविक ठार झाले आहेत, तसेच या घटनेत 10 जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आले आहे. या सर्व जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.
