Sangli Politics : सांगलीत राष्ट्रवादीची ताकद वाढली, चार माजी आमदारांचा अजितदादांच्या पक्षात प्रवेश

Sangli Politics : सांगली जिल्ह्यातील चार माजी आमदारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. मुंबईत झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात शिराळ्यातील शिवाजीराव नाईक (Shivajirao Naik) , कवठेमहांकाळचे अजितराव घोरपडे (Ajitrao Ghorpade) , आटपाडीचे राजेंद्रअण्णा देशमुख (Rajendra Anna Deshmukh) आणि जतचे विलासराव जगताप (Vilasrao Jagtap) या माजी आमदारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
या चार माजी आमदारांसह आज भाजपच्या जिल्हा युवा मोर्चाच्या अध्यक्ष अनिल पाटील आणि जत मध्ये भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवलेल्या तमनगौडा रवी पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आज झालेल्या या पक्षप्रववेशानंतर सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ताकद वाढणार आहे.
या कार्यक्रमात बोलताना राज्यात आतापर्यंत आपण शिव, शाहू, फुले यांच्या विचाराने काम करत आलो आहोत आणि पुढे देखील याच विचाराने काम करणार असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. तसेच येणाऱ्या काळात सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार आहे असा विश्वास देखील अजित पवार यांनी वर्तवला. तर राजकीय जीवनात नेहमी नवीन लोकांना संधी द्याची असते असेही अजित पवार म्हणाले.
तर लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हाव्या यासाठी सर्वोच्च न्यायालयात आमचे प्रयत्न सुरु असून लवकरच याबाबत निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. असं यावेळी अजित पवार म्हणाले.
फालतू याचिका दाखल करु नका, सर्वोच्च न्यायालयाने वकिलाला ठोठावला तब्बल 5 लाखांचा दंड, कारण काय?