ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही, कारवाई करु; चंद्रहार पाटलांनी साथ सोडताच राऊतांचा इशारा

ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही, कारवाई करु; चंद्रहार पाटलांनी साथ सोडताच राऊतांचा इशारा

Sanjay Raut On Chandrahar Patil :  शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी ठाकरे गटाला सांगलीमध्ये (Sangli) मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेना हे कोणत्याही प्रकारचं दाबाव आणि ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही. पक्षात राहून पक्षाविरुद्ध कार्यवाही कराल तर तुमच्यावर कार्यवाही होईल. अशी रोखठोक भूमिका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मांडली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी चंद्रहार पाटलांवरुन (Chandrahar Patil) भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला आहे.

माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, पैशाच्या ताकदीवर लोक विकत घेणं, तपास यंत्रणांचा गैरवापर करून एखाद्याला दुसऱ्या पक्षात जाण्यास भाग पाडणे याला आउटगोइंग इनकमिंग अशा उपमा देऊ नका.  दोन तास आमच्याकडे इडी, सीबीआय आणि पोलिस आले तर राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या पासून भाजप हा 90% आउटगोइंग करेल असं माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले.

तसेच देशाच्या राजकारणात शिवसेना हा पक्ष सर्वात जुन्या पक्षांपैकी एक आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेना हे कोणत्याही प्रकारचं दाबाव आणि ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही. पक्षात राहून पक्षाविरुद्ध कार्यवाही कराल तर तुमच्यावर कार्यवाही होईल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) या पक्षाचे प्रमुख आहेत. इनकमिंग आउटगोइंग या शब्दाचा वापर जपून करा, पक्षांतर्गत कुठलेही हेवे दावे ब्लॅकमेलिंग दबाव हे शिवसेना पक्षप्रमुख सहन करणार नाही. असेही यावेळी खासदार राऊत म्हणाले.

बडगुजर विषय आमच्यासाठी संपला 

तर यावेळी त्यांनी नाशिकचे शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. खासदार राऊत म्हणाले की, बडगुजर विषय आमच्यासाठी संपला आहे. कारवाई झाली, विषय संपला. पक्षप्रमुखांच्या आदेशाने झालेली कारवाई ही कधीच चुकीची नसते.

कैद्यांकडून 550 कोटी, लॉकरमधील पैसे अन् सोनं हडपलं, IPS सुपेकरांच्या मुजोरीचा आणखी एक प्रताप!

त्या कारवाईसाठी फार विचार केला जातो, आपापसात चर्चा केली जाते, स्थानिक पातळीवर चर्चा केली जाते, चुकीची कारवाई आमच्याकडून होत नाही.  मी म्हणजे पक्ष, कुठेही, माझ्यामुळे पक्ष, मी सांगेन तोच पक्ष, हे धोरण शिवसेनेत कधीच राबवत नाही. असेही यावेळी संजय राऊत म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube