ठाकरेंनी हाकललेल्या बडगुजरांना ‘होम ग्राऊंडवर’ चं विरोध; भाजप प्रवेश रखडणार?

ठाकरेंनी हाकललेल्या बडगुजरांना ‘होम ग्राऊंडवर’ चं विरोध; भाजप प्रवेश रखडणार?

MLA Seema Hire On Sudhakar Badgujar : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नाशिकमध्ये (Nashik) राजकारण चांगलेच तापले आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेत ठाकरे गटावर असणारी नाराजी बोलवून दाखवली होती. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर आता सुधाकर बडगुजर भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची चर्चा नाशिकच्या राजकारणात चांगलीच रंगली आहे. तर दुसरीकडे भाजप आमदार सीमा हिरे (Seema Hire) यांनी सुधाकर बडगुजर यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला विरोध करत त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहे.

माध्यमांशी बोलताना आमदार सीमा हिरे म्हणाल्या की, प्रेसच्या माध्यमातून समजले भाजपमध्ये बडगुजर येण्यास इच्छुक आहे मात्र त्यांच्या पक्षप्रवेशाची मला माहिती नाही. मी 2014 आणि 2024 मध्ये त्यांच्याविरोधात निवडणूक लढले, या निवडणुकी अनेक महत्त्वाचे मुद्दे होते. त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला आहे. तसेच त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)  फिरण्यासाठी मकाऊला गेले असता, ते कॅसिनो खेळले असं सांगत त्यांच्या बदनामीचा प्रयत्न केला.

तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल केला. नाशिक पोलिसांनी त्यांना जेवत्या ताटावरुन उठवलं, बडगुजर यांची प्रतिमा खूप मलिन आहे. असं माध्यमांशी बोलताना आमदार सीमा हिरे म्हणाल्या.

हिंदी भाषेवरून मनसे पुन्हा ‘खळ्ळखट्याक’ च्या तयारीत; ठाकरेंनी थेट धाडलं दादा भुसेंना खरमरीत पत्र 

सुधाकर बडगुजर गुन्हे लपविण्यासाठी भाजपमध्ये येत आहेत – सीमा हिरे

माध्यमांशी पुढे बोलताना सीमा हिरे म्हणाल्या की, सुधाकर बडगुजर यांचा सलीम कुत्ता याच्यासोबत नाचताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यांच्याविरोधात 17 गुन्हे दाखल आहे. हे गुन्हे कुठे तरी लपवायचे आहेत म्हणून ते भाजपमध्ये येण्यास इच्छूक असतील. त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल असल्याने कारवाई होणार त्यामुळे त्यांनी ठरवलं असेल भाजपमध्ये प्रवेश करु असं माध्यमांशी बोलताना आमदार हिरे यांनी म्हटलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube