भाच्याने भाजप प्रवेशाचे पत्ते झाकले, मामांचाही सस्पेन्स कायम; प्राजक्त तनपुरेंचा सूचक इशारा काय?

भाच्याने भाजप प्रवेशाचे पत्ते झाकले, मामांचाही सस्पेन्स कायम; प्राजक्त तनपुरेंचा सूचक इशारा काय?

Ahilyanagar News : राज्यात सत्ताधारी पक्षामध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. यातच राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे (Prajkt Tanpure) भाजपच्या वाटेवर आहे अशा चर्चा आहे. यावर खुद्द तनपुरे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. वरिष्ठ पातळीवर काय निर्णय चालले आहे हे आधी पाहू त्यानुसार योग्य निर्णय होईल. तसेच राजकारणात सगळेच पत्ते उघडून दाखवायचे नसतात. योग्य वेळी योग्य निर्णय होईल असे सूचक वक्तव्य माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे.

राहुरीमधील तनपुरे सहकारी कारखाना निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीमध्ये अरुण तनपुरे यांचा जनसेवा पॅनल विजयी झाला. मात्र या निवडणुकीमध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली. विखे गटाने चक्क या निवडणुकीमध्ये माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे चुलते अरुण तनपुरे यांच्या जनसेवा पॅनलला जिंकण्यासाठी मदत केली. याबाबतची माहिती खुद्द राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लेट्सअपशी बोलताना दिली.

राहुरी तनपुरे कारखाना निवडणुकीमध्ये अरुण तनपुरे यांचा जनसेवा पॅनल होता तर त्यांच्या विरोधात राजूभाऊ शेटे यांचा शेतकरी विकास मंडळ पॅनल होता. शेटे यांनी विधानसभेला राहुरीचे आमदार शिवाजी कर्डीले यांच्यासाठी प्रचार केला होता. यावरूनच माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी कर्डिलेंना जोरदार टोला लगावला.

राहुरीच्या सहकारी साखर कारखान्यात तनपुरे गटाने मारली बाजी; सर्व 21 जागांवर दणदणीत विजय

शेटे यांनी कर्डीले यांच्यासाठी निवडणुकीमध्ये प्रचार केला. शेटे यांचा पॅनल साखर कारखान्याच्या निवडणुकीत होता. मात्र त्यांच्यासाठी कर्डिले कुठेही दिसले नाहीत. विखेंनी या निवडणुकीमध्ये तटस्थ भूमिका ठेवली होती. त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमचे काम केले हे सत्य आहे. मात्र काही ठिकाणी काम केले नाही. मात्र अनेकांची मदत आम्हाला या निवडणुकीमध्ये झाली असल्याचे स्पष्ट वक्तव्य माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले.

मामा जयंत पाटील भाजपात जाणार, भाच्याला काय वाटतं ?

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) भाजपमध्ये जाणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. यावर देखील तनपुरे यांनी भाष्य केले आहे. जेव्हा पक्षातून अनेकजण बाहेर गेले अशा संकटाच्या काळात जयंत पाटील यांनी पक्ष सांभाळला. जयंत पाटील एकनिष्ठेने शरद पवार यांच्यासोबत राहिले. त्यांनी पक्ष वाढीसाठी काम केले. पदाला चिटकून राहणारे ते नेते नाही. जयंत पाटील भाजप वाटेवर यावर तनपुरे म्हणाले, त्यांचे सर्वच राजकीय नेत्यांशी चांगले संबंध आहेत. यामध्ये काही गैर नाही. मात्र शरद पवार यांच्या विचारांबाहेर जाऊन जयंत पाटील असा काही निर्णय घेतील असं वाटत नाही असे देखील यावेळी माजी आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले आहेत.

दानवे अन् थोरातांच्या शिष्टाईने प्राजक्त तनपुरेंचे अन्नत्याग उपोषण स्थगित; राज्यव्यापी आंदोलनाचा दिला इशारा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube