महापुरुषांचा अवमान! माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंचा उपोषणाचा तिसरा दिवस…

महापुरुषांचा अवमान! माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंचा उपोषणाचा तिसरा दिवस…

Prajakt Tanpure : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी उपोषणाचा आक्रमक पवित्रा घेतलायं. आज या उपोषणाचा तिसरा दिवस असून महापुरुषांचा अपमान सहन करणार नसल्याचं माजी आमदार प्राजक्त तनपुरेंनी यावेळी स्पष्ट केलंय. राहुरी शहरातील शनी चौकात शेकडो कार्यकर्त्यांसह तनपुरे बेमुदत उपोषणला बसले आहेत.

Video : एक ब्राह्मण चुकला मग सगळ्यांना शिव्या का?, भाजप आमदार पडळकरांचा संभाजी ब्रिगेडवर वार

उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून या दिवशी राहुरी शहरातील शिवप्रेमी तसेच व्यापाऱ्यांच्यावतीने राहुरी बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला राहुरी शहराने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून राहुरी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आल्याचे पाहायला मिळाले. तर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपोषणाला विविध सामाजिक संघटनांकडून देखील पाठिंबा मिळत आहे.

श्रीरामपुरात काँग्रेसला धक्का! माजी नगराध्यक्षांसह 10 जणांच्या हाती कमळ; विखेंची खेळी यशस्वी

वीस दिवस उलटूनही आरोपी मिळत नसल्याची खंत यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केली तर छत्रपती शिवाजी महाराजांचा असा अपमान झालेला आम्ही कदापि सहन करणार नसल्याचे देखील यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

26 मार्च 2025 रोजी राहुरीतील बुवासिंदबाबा तालमीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. ही घटना स्थानिकांसाठी धक्कादायक ठरली, कारण शिवाजी महाराज हे केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्व नसून, महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. या कृत्याने नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या, आणि आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी जोर धरू लागली. मात्र, 20 दिवसांनंतरही पोलिसांना आरोपींचा सुगावा लागलेला नाही, ज्यामुळे प्रशासनावरील नाराजी वाढली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube