राहुरीच्या सहकारी साखर कारखान्यात तनपुरे गटाने मारली बाजी; सर्व 21 जागांवर दणदणीत विजय

Dr. Baburao Bapuji Tanpure Cooperative Sugar Factory : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या राहुरीच्या डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या (Dr. Baburao Bapuji Tanpure Cooperative Sugar Factory) निवडणुकीत तुनपुरे गटाने बाजी मारली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे (Arun Tanpure) यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळाने या निवडणुकीत सर्वच 21 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला आहे.
तर आता या निवडणुकीनंतर या कारखान्यात प्रथमच अरूण तनपुरे आणि त्यांचे सुपूत्र हर्ष तनपुरे दिसणार आहे. डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत यशानंतर राज्याचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) यांनी ‘एक्स’ वर पोस्ट करत विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत या विजयासाठी योगदान दिलेल्या सर्वांचे मनापासून आभार मानले आहे.
त्यांनी एक्सवर लिहिले की, हा विजयी गुलाल सत्याचा, शेतकऱ्यांच्या प्रगतीचा…! डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जनसेवा मंडळाने मिळवलेले घवघवीत यश हे आपल्या शेतकरी बांधवांचे आहे. जनसेवा मंडळावर आपण दाखविलेल्या विश्वासासाठी आम्ही सदैव कृतज्ञ राहू. निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज व्हावे, कारखान्याचे लौकिक वाढावे यासाठी तुम्ही समर्पणाने कार्य कराल हा विश्वास आहे. या विजयासाठी योगदान दिलेल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो🙏🏼 एकसंघतेने आपल्या भागाची प्रगती करूयात!
हा विजयी गुलाल सत्याचा, शेतकऱ्यांच्या प्रगतीचा…!
डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जनसेवा मंडळाने मिळवलेले घवघवीत यश हे आपल्या शेतकरी बांधवांचे आहे. जनसेवा मंडळावर आपण दाखविलेल्या विश्वासासाठी आम्ही सदैव कृतज्ञ राहू.
निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व… pic.twitter.com/jlqebOrIhy
— Prajakt Prasadrao Tanpure (@prajaktdada) June 1, 2025
डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक 31 मे रोजी पार पडली होती. तर या निवडणुकीची 1 जून रोजी राहुरीतील लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालयाच्या क्रीडा हॉलमध्ये मत मोजणी पार पडली.
देशात कोरोना वाढतोय, सक्रिय रुग्ण 3758, ‘या’ राज्यात सर्वाधिक
या निवडणुकीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांचे जनसेवा मंडळ व राजू शेटे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास मंडळामध्ये मुख्य लढत पाहायला मिळाली होती.