आयपीएलच्या धामधुमात ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडूसाठी वाईट बातमी, ‘त्या’ प्रकरणात 4 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा

आयपीएलच्या धामधुमात ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडूसाठी वाईट बातमी, ‘त्या’ प्रकरणात 4 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा

Michael Slater : संपूर्ण जगातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष सध्या इंडियन प्रीमियर लीगकडे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे इंडियन प्रीमियर लीगच्या या धामधुमात ऑस्ट्रेलियन (Australia) खेळाडूसाठी वाईट बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार ऑस्ट्रेलिय खेळाडूला 4 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.समोर आलेल्या माहितीनुसार या खेळाडूचे नाव मायकेल स्लेटर आहे.

मायकेल स्लेटर (Michael Slater) ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी सलामीवीर फलंदाज असून त्यांने अनेक सामन्यात ऑस्ट्रेलियन संघासाठी शानदार कामगिरी केली आहे. मात्र आता त्याला घरगुती हिंसाचाराच्या आरोपात चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच्यावर घरगुती हिंसाचार, गळा दाबून मारणे, चोरी, हेरगिरी असे आरोप ठेवण्यात आले आहे. नूसा परिसरात राहणाऱ्या क्वीन्सलँडमधील (Queensland) एका महिलेने त्याच्यावर हे आरोप केले होते. या प्रकरणात तो एप्रिल 2024 पासून कोठडीत आहे. न्यायालयाने गेल्या वर्षी त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता.

तर दुसरीकडे या प्रकरणात निकाल देताना, क्वीन्सलँड जिल्हा न्यायालयाने सांगितले की,स्लेटर हा मद्यपी होता आणि हे त्याचे गुन्हाचे मुख्य कारण होते. तसेच आरोपीने पीडितेला घडलेली घटना कोणालाही न सांगण्याची धमकी दिली होती. या प्रकरणात आरोपीविरोधात पीडितेच्या वकिलाने पाच वर्षांची शिक्षेची मागणी केली होती मात्र न्यायालयाने माजी सलामीवीर फलंदाज स्लेटरला चार वर्षाची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेपैकी स्लेटरने एक वर्षाची शिक्षापूर्ण केल्याने त्याला पॅरोलसाठी आणखी तीन वर्ष आहे.

फालतू याचिका दाखल करु नका, सर्वोच्च न्यायालयाने वकिलाला ठोठावला तब्बल 5 लाखांचा दंड, कारण काय?

तर दुसरीकडे स्लेटरच्या वकिलाने असा युक्तिवाद केला की माजी फलंदाजाला फक्त तीन वर्षाची शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला तात्काळ पॅरोल मंजूर करण्यात याने मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube