‘जयंत पाटील फक्त कासाला मोठे, दुधाला नाही’; सांगलीतून गोपीचंद पडळकरांची जहरी टीका

‘जयंत पाटील फक्त कासाला मोठे, दुधाला नाही’; सांगलीतून गोपीचंद पडळकरांची जहरी टीका

Gopichand Padalkar On Jayant Patil : सांगलीत (Sangli Politics) आयोजित भाजपच्या संवाद मेळाव्यात आमदार गोपीचंद पडळकर यांनी (BJP MLA Gopichand Padalkar) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांवर (Jayant Patil) तीव्र शब्दांत टीका केली. त्यांनी जयंत पाटलांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्यांनी सांगलीसाठी काय केले? असा सवाल केला. अत्यंत खालच्या शब्दांमध्ये जयंत पाटलांवर टीका केली आहे. पडळकरांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?

सांगलीचं सगळ्यात जास्त वाटोळं जयंत पाटलांनी केलंय. हे तुम्हाला माहित आहे. जयंत पाटील कासाला मोठे आहेत, दुधाला नाही. त्यांचा नेता पण तसाच आहे. त्यांच्यावर बोलू नका, म्हणून मला सूचना आहेत. परंतु ती फक्त कासाला मोठी दिसणारी माणसं (Sangli Politics) आहेत. जर एखाद्या हमालाच्या पोराच्या प्रवेशाला इतकी गर्दी होत असेल, तर तुम्ही विचार करा ना. या महापालिका निवडणुकीच्यानंतर कोणाची किती ताकद आहे, ते तुम्हाला कळणार आहे. त्यामुळे खुर्च्यांना जर अजमवा. त्यांची काय परिस्थिती आहे, हे त्यांना कळेल की, त्यांच्या पायाखालची सगळी वाळू पुर्णपणे सरकलेली आहे.

टॅरिफ वॉर थांबणार? अमेरिकेने घेतला मोठा निर्णय, चीनवरील कर निलंबन…

सांगलीत राजकीय वातावरण तापलं….

सांगलीत भाजपे खासदार विशाल पाटील यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचायला सुरूवात केली आहे. जयश्री मदन पाटील या खासदार विशाल पाटील यांच्या चुलत वहिनी असून त्यांनी काही दिवसांपूर्वी जवळच्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता विशाल पाटील यांना निवडून आणण्यात वाटा असलेले माजी नगरसेवक मनोज सरगर काल भाजपात. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे स्वतः उपस्थित होते.

भिवंडीत रक्तरंजित थरार! भाजप पदाधिकाऱ्यासह एकाची निर्घृण हत्या; कार्यालयातच संपवलं, मारेकरी फरार

जयंत पाटलांवर जहरी टीका

कार्यक्रमामध्ये बोलताना गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर जहरी टीका केली. एका हमालाच्या पोराच्या पक्ष प्रवेशाला एवढी गर्दी होत असेल, तर तुम्ही विचार करा. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत कोणाची किती ताकद आहे, हे तुम्हाला कळणार… असेही पडळकर म्हणाले. या मेळाव्यात पडळकर यांनी जयंत पाटलांच्या राजकीय कारकिर्दीवर टीका केली. भाजपच्या आगामी रणनीतीवर भाष्य केलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे सांगलीतील राजकीय वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube