Mumbai Pune Expressway : मुंबई पुणे महामार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. पहाटे ही दरड कोसळली असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे लोणावळा घाट ते उर्से तळेगावपासून वाहतूक बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. यंत्रणा दरड हटवण्याचे काम करत आहे. लवकर वाहतूक सुरु होईल असे सांगण्यात येत आहे. वाहतूक ठप्प असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याच्या पाहायला मिळत आहे. जवळपास गेल्या एक ते दीड तासापासून वाहतूक ठप्प आहे. (Small Landslide Near Lonavala On Mumbai Pune Expressway Traffic Snarls Near Urse Toll Plaza)
या महामार्गावर रात्री देखील 1 वाजण्याच्या सुमारास आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली होती. यामुळे मुबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली. दरड कोसळण्याच्या भीतीमुळे पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक देखील बंद ठेवण्यात आली आहे. सध्या महामार्गावरील वाहतूक पूर्व पदावर आण्याचे काम सुरु आहे. सध्या मुंबईकडे जाणाऱ्या दोन लेन सुरु करण्यात आल्या आहेत. लवकर संपूर्ण महामार्गावरील वाहतूक सुरु करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.
पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर मौजे आडोशी गावच्या हद्दीत जवळ मुंबई लाईनवर डोंगर भागातून दरड कोसळून मुंबई बाजूच्या तिन्ही लेनवर पडलेली आहे. यामुळे मुंबई लेनवरील वाहतूक थांबलेली आहे. दरड आयआरबीच्या जेसीपी, डंपरच्या साहाय्याने काढून टाकण्याचे काम सुरु आहे. साधारणतः मोठ्या प्रमाणात लगदा रोडमध्ये पडलेला आहे. यामध्ये सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
आयआरबी कर्मचारी, बोरघाट वाहतूक पोलिस, खोपोली पोलिस स्टेशनचा स्टाफ घटनास्थळी उपस्थित असून लगदा काढण्याचे काम सुरु आहे.