Video : कधीकधी गोष्टी आपल्या मनाप्रमाणे.., लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाने पहिल्यांदाच सोडलं मौन

Smriti Mandhana : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना विश्वचषक 2025 नंतर खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी

Smriti Mandhana

Smriti Mandhana

Smriti Mandhana : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना विश्वचषक 2025 नंतर खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी संगीतकार पलाश मुच्छलसोबत ती लग्न करणार होती मात्र काही कारणाने लग्न मोडल्याने सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे स्मृती पलाश मुच्छलसोबत लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच एका सर्वाजनिक कार्यक्रमात दिसली. यावेळी भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर देखील उपस्थित होती. या कार्यक्रमात बोलताना मला क्रिकेटपेक्षा जास्त काहीच आवडत नाही असं मत स्मृतीने व्यक्त केलं.

या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक मंदिरा बेदी यांनी स्मृतीला (Smriti Mandhana) आयुष्यात इतके चढ-उतार असूनही तु क्रिकेटवर कशी लक्ष केंद्रित करते असा प्रश्न विचारला होता. यावर बोलताना स्मृती म्हणाली की, मला वाटत नाही की मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडते. भारतीय जर्सी घालणे ही आमची सर्वात मोठी प्रेरणा आहे. तुम्ही तुमच्या सर्व समस्या बाजूला ठेवता आणि त्यामुळेच तुम्हाला जीवनावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते असं स्मृती म्हणाली.

तसेच मी 12 वर्षांहून अधिक काळ क्रिकेट खेळत आहे आणि कधीकधी गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत. आम्हाला 2025 च्या विश्वचषकाने दोन महत्वाचे धडे दिले. प्रत्येक डाव शून्यपासून सुरु होते,जरी तुम्ही मागील डावात शतक केले असले तरीही आणि कधीही स्वत;साठी खेळू नका हेच आम्ही एकमेकांना आठवण करुन देत राहिलो असं देखील या कार्यक्रमात बोलताना स्मृती म्हणाली.

तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल (Palash Muchhal) यांचे लग्न मोडलं आहे. याबाबत सोशल मीडियावर स्मृतीने माहिती दिली आहे. मात्र लग्न का मोडलं याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. तर पलाश मुच्छलच्या दुसऱ्या अफेअरमुळे स्मृतीने लग्न न करण्याचा निर्णय घेतला अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.

Goa Night Club Fire Tragedy : गोवा नाईटक्लब आग प्रकरण, थायलंडमध्ये लुथरा बंधूंना अटक

हा विषय इथंच थांबवायला मला आवडेल

लग्न मोडण्याची माहिती देत स्मृतीने सोशल मीडियावर लिहिले होते की, गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप चर्चा आणि अफवा पसरत आहे. म्हणून मला आता स्वत: बोलणं गरजेचं वाटतं आहे. माझं आयुष्य खूप खाजगी आहे पण एक गोष्ट स्पष्ट सांगते की लग्न रद्द झालं आहे. हा विषय इथंच थांबवायला मला आवडेल आणि तुम्ही सगळ्यांनीही तसं करावं अशी विनंती.

Exit mobile version