Download App

…तर मी संघटनेचं काम, धमकीनंतर अंनिसचे श्याम मानव यांचं मोठं वक्तव्य

नागपूर : जर धमक्यांमुळे माझ्या कामांवर परिणाम झाला असता तर ४० वर्षापुर्वी हे संघटनच सुरु केलं नसतं, अशी प्रतिक्रिया अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी दिलीय. बागेश्वरधामचे धीरेंद्र कृष्ण महाराजांवर आरोप केल्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय.

धमकी आल्यानंतर मानव म्हणाले, पुरोगामी विचाराचे दाभोळकर यांच्या हत्येनंतर मी माझं बोनस आयुष्य जगत आहे. त्यामुळे धमकीचा विरोधात मागील 40 वर्षांपासून काम करत असल्याने धमकी आली त्यात काही नवीन नाही. मी धर्माचा विरोधात नाही तर लुबाडणुकीच्या विरोधात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

तसेच नाशिकमध्ये अंधश्रद्धा निर्मुलन कायद्यावर बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर पोलिस यंत्रेणेने तपास केल्यास यामागे सनातन संघटना असल्याचा आरोप त्यांनी केलाय. दोन्ही संघटनानांचे गृहमंत्री यांचं शहर आहे, त्यामुळे आव्हानांची प्रक्रिया शांततेत पार पडू शकते, म्हणूनच धीरेंद्र महाराजांनी नागपुरात यावे, असे आवाहन श्याम मानव यांनी केलं आहे.

धीरेंद्र महाराज यांच्यात खरंच दिव्य शक्ती असेल तर, त्यांनी नागपुरता येऊन आव्हान स्वीकारत सिद्ध करावे, असं आव्हान मानव यांनी दिलं होतं. धमक्यांमुळे माझ्या कामांवर परिणाम झाला असता तर ४० वर्षापुर्वी हे संघटनच सुरु केलं नसतं, असंही त्यांनी म्हटंलय.

तर शंकऱ्याचार्य यांनी म्हटलं की, नैसर्गिक आपत्तीची माहिती धीरेंद्र महाराज यांनी द्यावी,असंही आव्हान त्यांनी पुन्हा एकदा धीरेंद्र महाराजांनी दिलंय.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धीरेंद्र महाराजांच्या दिव्य शक्तीचा उपयोग देशाच्या सुरक्षेसाठी करुन आतंदवादी कारवाई रोखाव्यात असंही ते म्हणाले आहेत.

Tags

follow us