Navneet Kowat Appointed 5 Member Team For Mahadev Munde Case : बीडमधून (Beed) मोठी बातमी समोर आलीय. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा (Mahadev Munde Case) तपास करण्यासाठी 5 सदस्यीय पथकाची नेमणूक करण्यात आलीय. एसपी नवनीत कॉवत (SP Navneet Kowat) यांनी हा महत्वाचा निर्णय घेतलाय. दहा दिवसांच्या आत ठोस कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाला बसणार, अशी आक्रमक भूमिका महादेव मुंडे यांच्या पत्नीने घेतली होती. याच पार्श्वभूमीवर त्यांनी एसपींची भेट घेतली होती. त्यानंतर याप्रकरणी तपासासाठी दबाव वाढला होता.
VIDEO : मी गुन्हेगार, काम थांबल्यामुळं रणवीर अलाहाबादिया ढसाढसा रडला; पण, सत्य मात्र वेगळंच
परळी तहसील कार्यालयासमोर भर रस्त्यात महादेव मुंडे यांचा खून झाला होता. घटनेला 15 महिने उलटले तरी आरोपी मोकाटच फिरत आहेत. न्यायासाठी किती वाट बघायची? अशी भूमिका महादेव मुंडेंच्या पत्नीने घेतली होती. याप्रकरणी त्यांनी आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर एसपी साहेबांनी या प्रकरणाची चौकशी तातडीने करण्यासाठी पाच सदस्यीय पथकाची नेमणूक केलीय. याच पार्श्वभूमीवर एसपी नवनीत कॉवत यांनी मोठा निर्णय घेतलाय.
याप्रकरणी काही दिवसांपूर्वी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या होत्या की, आमची एसपी सरांकडे एवढीच मागणी आहे की, आमच्या केसमध्ये तुम्ही जास्तीत जास्त दखल घ्या. एसआयटी किंवा सीआयडी तात्काळ द्या. नाहीतर, आम्ही एसपी ऑफिससमोर आमरण उपोषण करू, असा इशारा त्यांनी दिला होता. याअगोदर एसपी साहेबांना भेटलो होतो. त्यावेळेस परळीची फाईल होती, चोरमुले सरांकडे गेली नव्हती. ती चोरमुले सरांकडे जावून देखील आम्हाला न्यायाची अपेक्षा नाही. कारण त्यांनी काहीच फॉलोअप दिला नाही. यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी एसपी साहेबांची भेट घेवून, त्यांना तीन दिवसांची मुदत दिली होती. त्याच पार्श्वभूमीवर एसपी नवनीत कॉवत यांनी मोठा निर्णय घेतलाय.
लव फिल्म्स निर्मित ‘देवमाणूस’चा टीझर लाँच! छावा सिनेमासोबत सर्व चित्रपटगृहांमध्ये होणार प्रदर्शित
पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक पथक स्थापन केलंय. या पथकामध्ये एक पोलीस निरीक्षस अन् चार कॉन्स्टेबलचा समावेश आहे. एलसीबीचे पीआय राहिलेले संतोष साबळेंसह चार कॉन्स्टेबल आता महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास करणार आहेत. महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी दबाव वाढला असल्याचं चित्र आहे.
परळीमध्ये मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 60 दिवसांहून अधिक काळ लोटलाय. तरीही अजून या प्रकरणातील एक आरोपी फरारच आहे. पुरावे नष्ट करण्याचे षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप होतोय. तर दुसरीकडे महादेव मुंडे यांच्या हत्येला 15 महिने उलटून गेले तरी तपास यंत्रणा हलत नाही, असा संताप मुंडे कुटुंबीय व्यक्त करत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील या प्रकरणाच्या तपासावरून सवाल उपस्थित केलेत.