Download App

तुम्हाला सत्तेतून खेचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; ‘भटकता आत्मा’वरून पवारांचा पलटवार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भटकती आत्मा केल्यानंतर पवारांनी जोरदार पलटवार केला आहे. पवार म्हणाले, हा भटकता आत्मा तुम्हाला सत्तेतून खाली खेचणार.

Sharad Pawar criticizes Modi :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शरद पवार यांनी आज भटकती आत्मा या टीकेवरून आपल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार घणाघात केला. काही दिवसांपूर्वी भटकी आत्मा म्हणून टीका केली. (Sharad Pawar) भटकती आत्मा कोण असोत? जेव्हा माणसाचं निधन होतं तेव्हा आत्मा म्हणतो. परंतु, यांनी अशी अशी टीका केली. परंतु, हा भटकता आत्मा तुम्हाला सत्तेतून बाहेर फेकल्याशिवाय राहणार नाही अस थेट चॅलेंज पवारांनी मोदींना या सभेत दिलं.

 

मोदींचा पवारांवर वार, ठाकरेंचा पलटवार; म्हणाले, मोदी वखवखलेला, विभुक्षित आत्मा

धोरणांवर जोरदार टीका

शरद पवार यांनी भिंवडीत सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांच्यासाठी सभा घेतली. देशातील शेतकरी, कष्टकरी संकटात असून अल्पसंख्यांक समाजही चिंतेत आहे असं म्हणत पवार यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. तसंच, तुमच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेतील ही बाब भाजपवाले चुकीच्या पद्धतीने सांगत आहेत, असं म्हणत नाव न घेता शरद पवारांनी मोदींच्या भाषणावर पलटवार केला.

 

मराठी तरुण उभा राहणार

ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला संकटकाळात वाचवायचं काम केलं त्यांच्या शिवसेनेला आपण नकली शिवसेना म्हणताय, हे महाराष्ट्र पाहत आहे. तुम्ही जरी विसरला असाल तरी. बाळासाहेब ठाकरेंचा विचार जे उद्धव ठाकरे पुढे घेऊन जात आहेत, त्या विचाराच्या पाठिशी शक्ती उभी केल्याशिवाय महाराष्ट्रातील मराठी तरुण, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील माणूस राहणार नाही, असंही शरद पवार म्हटले. मी म्हणेल त्या पद्धतीने लोकशाही हाच एककलमी कार्यक्रम देशाच्या पंतप्रधानांनी सुरू केलाय असा थेट आरोप पवारांनी केला.

 

Sharad Pawar : रशियाचा पुतीन अन् भारताचे मोदी यांच्यात फरक नाही; शरद पवारांचा थेट हल्लाबोल

हा आत्मा सत्तेतून बाजूला करणार

आमच्याबद्दल बोलताना तुम्ही म्हणालात की, या महाराष्ट्रात भटकती आत्मा आहे. पण, आत्मा कधी असतो, माणूस गेल्याच्या नंतर असतो, त्यांना चिंता पडलीय आम्हा लोकांची. भटकती आत्मा. मी एवढचं सांगतो, हा आत्मा तुम्हाला सत्तेतून बाजूला केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा पलटवार शरद पवार यांनी बीकेसीमधील सभेतून केला.

follow us