भाजप निर्दयी पक्ष! पहिला नंबर अजित पवारांचा अन् निवडणुकीनंतर गद्दारांचा; राऊतांनी थेटच सांगितलं

शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी अजित पवार महायुतीतून बाहेर पडण्यासह एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका केली.

भाजप निर्दयी पक्ष! पहिला नंबर अजित पवारांचा अन् निवडणुकीनंतर गद्दारांचा; राऊतांनी थेटच सांगितलं

भाजप निर्दयी पक्ष! पहिला नंबर अजित पवारांचा अन् निवडणुकीनंतर गद्दारांचा; राऊतांनी थेटच सांगितलं

Sanjay Raut : भाजपवर कुणी विश्वासच ठेऊ नये. आज अजित पवारांचा काटा काढतील, निवडणूक झाली की शिंदे गटाचा काटा काढतील. कारण आम्ही त्यांचा अनुभव घेतलेला आहे. (Sanjay Raut) तसंच, भाजपने अशी वागणूक देशातील अनेक त्यांच्या मित्रपक्षाला दिली आहे. त्यामुळे अजित पवारांना बाहेर काढण्याचं षडयंत्र सुरू झालं आहे. असा थेट घणाघात शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

Mahayuti Crises: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार? अजित पवार महायुतीतून पडणार बाहेर?

भाजपला जास्त जागा लढवायला मिळतील या अनुषंगाने आता अजित पवारांना बाहेर काढण्याचं काम चालू झालं आहे. या कामात शिंदे गटाचा मोठा वाटा आहे असंही संजय राऊत यावेळी म्हणाले आहेत. तसंच, झारखंड, हरियाणा येथील निवडणुकीचा खर्ज भाजप शिंदे गटाकडून घेत आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केली आहे. त्यामुळे लवकरच या लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे असंही ते म्हणाले.

Exit mobile version