SSC HSC Exam Result : दहावी आणि बारावीचे निकाल कधी होणार जाहीर? समोर आली महत्त्वाची तारीख

SSC HSC Exams 2023 Result : शालेय जीवनातील टप्पा ओलांडून महाविद्यालयीन आयुष्यात प्रवेश करु पाहणाऱ्या आणि इयत्ता दहावीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, दहावीच्या परीक्षांच्या निकालांची. नुकतीच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 2022- 23 या शैक्षणिक वर्षासाठी बोर्डाची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षा संपल्यावर विद्यार्थांची सुट्टी सुरु झाली […]

SCC HSC Result

SSC HSC Exam Result

SSC HSC Exams 2023 Result : शालेय जीवनातील टप्पा ओलांडून महाविद्यालयीन आयुष्यात प्रवेश करु पाहणाऱ्या आणि इयत्ता दहावीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, दहावीच्या परीक्षांच्या निकालांची. नुकतीच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 2022- 23 या शैक्षणिक वर्षासाठी बोर्डाची परीक्षा घेण्यात आली.

या परीक्षा संपल्यावर विद्यार्थांची सुट्टी सुरु झाली आणि सुट्टीला महिनाही पूर्ण होत नाही, तोच या परीक्षांच्या निकालांची माहिती समोर आली आहे. यंदाच्या वर्षी इयत्ता १० सोबतच इयत्ता १२ वीच्या परीक्षांचे निकाल निर्धारितक वेळेतच लागणार असल्याची माहिती मिळत समोर आली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये १२ वीचे निकाल लागणार आहे, तर 10 जूनपर्यंत इयत्ता १० वीचे निकाल लागणार असल्याची माहिती मिळाली आहे.

संपाचे निकालांवर परिणाम?

दरम्यान, प्रलंबित मागण्या आणि जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, याकरिता सरकारी कर्मचारी आणि शिक्षण वर्ग, शिक्षकेतर वर्गाने गेल्या काही दिवसांअगोदर पुकारलेल्या संपाचे या निकालांवर काही परिणाम होणार का? याची चिंता विद्यार्थी आणि पालक वर्गाकडून व्यक्त करण्यात आली होती. पण, आता मात्र हे चित्र जास्त असल्याचे स्पष्ट होत आहे.

गरजेपेक्षा जास्त लिंबाचे सेवन ठरते घातक

या 8 दिवसांच्या संपाचा विद्यार्थ्यांच्या निकालांवर परिणाम होणार नाही. उत्तर पत्रिका तपासणीसाठी अपेक्षेहून जास्त वेळ दवडला जाणार नसल्याचे सांगितले आहे. यामुळे मे महिना अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये १२ वीचे आणि त्यापाठोपाठ १० वीचे निकाल लागणार आहेत. शिक्षण मंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार इयत्ता १२ वीचे निकाल लागल्यावर आठवड्याभरातच १० वीचेही निकाल लागणार आहे.

यानंतर पुढील महाविद्यालयीन प्रवेश आणि पदवी प्रवेश प्रक्रिया कालांतरानं सुरु होणार आहेत. यामुळे कोणत्या क्षेत्रात पुढे जायचं आहे ते विद्यार्थांनी आतापासूनच ठरवले तर पुढील प्रक्रिया सोप्या राहणार आहेत. दरम्यान, निकालानंतर पुनर्तपासणीसाठीचे अर्ज आणि त्याबाबत असलेली माहिती अद्याप शिक्षण मंडळाकडून देण्यात आली नाही.

Exit mobile version