Download App

कमी पटसंख्यांच्या शाळांना कंत्राटी नाही, नियमित शिक्षक शिकवणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय!

contract teacher राज्य सरकारकडून शिक्षक भरती संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

  • Written By: Last Updated:

State Government decision on contract teacher : राज्य सरकारने राज्यातील शिक्षकांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.कारण राज्य सरकारकडून शिक्षक भरती संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्यातील शिक्षकांसाठी हा आशेचा किरण ठरणार आहे.

तानाजी सावंतांचा मुलगा, दोन मित्र आणि थेट बॅंकॉकला उड्डाण ! संपूर्ण स्टोरीच जाणून घ्या

या निर्णयानुसार याचा सरकारी शाळांमध्ये दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डीएड आणि बीएड धारक शिक्षकांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात येणार नाही. तर या शाळांना नियमित शिक्षक पुन्हा शिकवू शकणार आहेत.

मोठी बातमी! रणवीर अल्लाहबादिया-समय रैनासह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

या अगोदरच्या निर्णयानुसार राज्यातील ज्या शाळेमध्ये दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्या होती तेथे डीएड आणि बीएड झालेल्या शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने भरती केले जात होतं. कारण नियमित शिक्षक नियुक्त होईपर्यंत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी सप्टेंबर 2024 मध्ये हा निर्णय घेण्यात आला होता.

मात्र आता 2022 मध्ये जाहीर केलेल्या निर्णयानुसार शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा पूर्ण केला जाणार आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी मधील गुणांच्या आधारे जे शिक्षक पात्र ठरतील त्यांना नियमित तत्त्वावर भरती केले जाणार आहे. तसेच नियमित शिक्षकांच्या जागी सध्या कार्यरत असलेले कंत्राटी शिक्षक हे नियमित शिक्षकांच्या नियुक्तीपर्यंत पदावर कार्यरत राहतील.

follow us