तानाजी सावंतांचा मुलगा, दोन मित्र आणि थेट बॅंकॉकला उड्डाण ! संपूर्ण स्टोरीच जाणून घ्या
![तानाजी सावंतांचा मुलगा, दोन मित्र आणि थेट बॅंकॉकला उड्डाण ! संपूर्ण स्टोरीच जाणून घ्या तानाजी सावंतांचा मुलगा, दोन मित्र आणि थेट बॅंकॉकला उड्डाण ! संपूर्ण स्टोरीच जाणून घ्या](https://images.letsupp.com/wp-content/uploads/2025/02/Rishiraj-Sawant_V_jpg--1280x720-4g.webp)
Tanaji Sawant son was going Bangkok while rumors of kidnaping : माजी मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचा मुलगा ऋषीराज सावंत यांचं पुणे विमानतळावरून अपहरण झाल्याची माहिती समोर आली होती मात्र ऋषीराज सावंत यांचं अपहरण झालं नसून ते व त्यांचे मित्र हे विमानाने बँकॉकला चालले होते. त्याचवेळी वडील तानाजी सावंत यांनी सर्व सूत्र हलवत त्यांचे विमान चेन्नईतून माघारी फिरवलं. मात्र हे प्रकरण नेमकं काय जाणून घेऊ सविस्तर…
मोठी बातमी! रणवीर अल्लाहबादिया-समय रैनासह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
दुपारपासूनच तानाजी सावंत यांचा मुलगा सुरुवातीला बेपत्ता असल्याच्या बातम्या आल्या. त्याच्यानंतर कंट्रोलरूमला त्याचं अपहरण झाल्याचा एक निनावी फोन देखील आला. त्यानंतर पोलिसांमध्ये ऋषीराज सावंत याचं अपहरण झालं आहे. अशी तक्रार दाखल झाली आणि झपाट्याने तपास सुरू झाला.
BYD Sealion 7 पावरफुल बॅटरी अन् 567 किमीची रेंजसह 17 फेब्रुवारी रोजी होणार लाँच
दुसरीकडे स्वतः मंत्री तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यानंतर मंत्री मुरलीधर मोहोळ असे सर्वांना संपर्क करत यंत्रणेची मदत घेतली. कारण पोलीस तपासामध्ये सावंत यांचा मुलगा ऋषीराज हा मित्रांसोबत एअरपोर्टवर गेल्याचे ड्रायव्हरने सांगितलं होतं. त्यामुळे त्याचा अपहरण झालं नसणार असेही सावंत म्हणाले. तसेच ऋषीराजने तब्बल 68 लाख रुपये खर्च करून बँकॉकला चालला होता. असे देखील सांगण्यात येत आहे. मात्र हे खाजगी विमान पोलीस तपस आणि मुरलीधर मोहोळ यांच्या मदतीने सावंतांनी चेन्नईमध्ये उतरवलं आणि मुलाला थेट पुण्यामध्ये बोलावून घेतलं. रात्री नऊ वाजता त्यांचा मुलगा पुण्यामध्ये पोहोचला आहे.
मात्र सावंतांचा मुलगा बँकॉकला का चालला होता? तसेच त्याच्यासोबत असलेले हे मित्र कोण होते. याचे सविस्तर तपास पोलीस करत आहेत. दरम्यान तानाजी सावंत आणि मुलगा आहे एकाच घरात राहत होते. दररोज त्यांचा कित्येकदा संवाद होत होता. मात्र आज दिवसभरात त्याचा आणि सावंत यांचं कोणत्याही प्रकारचं बोलणं झालं नव्हतं. त्यामुळे या सर्व प्रकारामुळे तानाजी सावंत यांना काळजी लागून राहिली होते.