Pune Lodge Case : पुण्यातील लॉज प्रकरणात मोठा ट्विस्ट; फक्त एकच आरोपी असल्याचे निष्पन्न

Pune Lodge Case : पुण्यातील लॉज प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय असून या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलीस आयुक्त

Pune Lodge Case

Pune Lodge Case

Pune Lodge Case : पुण्यातील लॉज प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय असून या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणात माहिती देत संपूर्ण घटनेत फक्त एकच आरोपी असल्याचे स्पष्ट केले आहे. अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनंतर सोशल मीडियावर फिरणाऱ्या विविध चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. या प्रकरणाशी पुण्यातील काही पत्रकारांची नावे जोडण्यात येत होती तसेच रुपाली पाटील यांनी या प्रकरणात देखील पोलीस आयुक्ताकडे तक्रार केली होती. मात्र या तक्रारीसोबत रुपाली पाटील यांनी कोणतेच पुरावे दिले नव्हते तसेच पोलिसांना देखील या पत्रकारांचा संबंध असल्याचे आढळून आले नाही.

या प्रकरणात माध्यमांशी बोलताना अमितेश कुमार (Amitesh Kumar) म्हणाले की, आतापर्यंतच्या तपासात संबंधित व्यक्ती लॉजमध्ये एकटाच गेला होता आणि त्याने तेथे आपत्तिजनक कृत्य केले. यानंतर मिळालेल्या फिर्यादीवरून त्याच्याविरोधात भादंवि कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमच्यासोबत इतर पत्रकार होते, आम्ही स्टिंग ऑपरेशनसाठी आलो होतो असा दावा आरोपीला पकडताना त्याच्याकडून करण्यात आला होता. सध्या हा आरोपी फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या पथकांची नियुक्ती केली आहे. त्याला अटक झाल्यानंतर आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

तर दुसरीकडे या प्रकरणात कोणत्याही लोकप्रतिनिधीने हस्तक्षेप नसून या संदर्भात आम्हाला कोणताही फोन आलेला नाही. कारवाई ही केवळ फिर्याद आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारेच करण्यात आली आहे असल्याची देखील माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

तसेच रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी काही पत्रकारांची नावे घेत साजिश असल्याचा दावा करणारा अर्ज दिला आहे. मात्र, त्या अर्जासोबत कोणताही ठोस पुरावा सादर करण्यात आलेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. “आतापर्यंतच्या तपासात त्या आरोपांमध्ये तथ्य आढळलेले नाही, तरीही तपास सुरू आहे, असे आयुक्तांनी नमूद केले. याचबरोबर घटनेवेळी अनेक जण उपस्थित होते, काहींना मारहाण झाली या दाव्यांनाही पोलिसांनी खोटे ठरवले आहे.

घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील आणि संबंधित लॉजचे सखोल सीसीटीव्ही फुटेज तपासले. घटना घडण्याच्या दोन तासांपूर्वीपर्यंतचा संपूर्ण मागोवा घेतला गेला. तसेच मागील दीड-दोन वर्षांचे लॉजचे रेकॉर्ड तपासण्यात आले असता, आरोपी यापूर्वीही तीन वेळा तेथे आला असल्याचे उघड झाले.

“देऊळ बंद 2” च्या पोस्टरने जिंकली प्रेक्षकांची मने, चित्रपट खेचणार तुफान गर्दी?

दरम्यान, त्या लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या चर्चांबाबतही पडताळणी सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. “जर PITA कायद्यांतर्गत कोणतीही बेकायदेशीर कृती आढळली, तर निश्चितच कठोर कारवाई केली जाईल,” असे आयुक्तांनी सांगितले. सध्या आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. “तो अनट्रेसेबल आहे, मात्र लवकरच त्याला अटक करण्यासाठी आमची पथके प्रयत्न करत आहेत,” असे पोलिसांनी सांगितले.

Exit mobile version