Subhash Desai स्पष्टच बोलले… माझ्या मुलाचे राजकारणात काही अस्तित्व नाही!

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आणि माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात प्रवेश सोमवारी केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना सुभाष देसाई यांनी भूषण देसाई (Bhushan Desai) यांचा एकनाथ शिंदे गटातील प्रवेश क्लेशदायक आहे. तसेच माझ्या मुलाचे राजकारणात काही अस्तित्व नाही, […]

Subhash Desai Bhushan Desai

Subhash Desai Bhushan Desai

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आणि माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात प्रवेश सोमवारी केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना सुभाष देसाई यांनी भूषण देसाई (Bhushan Desai) यांचा एकनाथ शिंदे गटातील प्रवेश क्लेशदायक आहे. तसेच माझ्या मुलाचे राजकारणात काही अस्तित्व नाही, असे देखील म्हटले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुभाष देसाई यांच्या मुलाने सोमवारी सायंकाळी शिंदे गटात प्रवेश केला आहे. सुभाष देसाई हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात आहे. त्यांच्याच घरात फूट पडल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर सुभाष देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Ajit Pawar यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात घातले अंजन : पालकमंत्री असलेल्या सहा जिल्ह्यांची कामगिरी निच्चांकी!

सुभाष देसाई म्हणाले की, गेल्या पाच दशकापासून माझं आणि शिवसेनेचे नातं आहे. ते तसेच राहणार आहे. माझा मुलगा शिंदे गटात गेला तरी काही फरक पडणार नाही. कारण माझा मुलगा हा राजकारणात नाही. त्याचे काही अस्तित्व नाही. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला काहीच फरक पडणार नाही.

Exit mobile version