Ajit Pawar यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात घातले अंजन : पालकमंत्री असलेल्या सहा जिल्ह्यांची कामगिरी निच्चांकी!

Ajit Pawar यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात घातले अंजन : पालकमंत्री असलेल्या सहा जिल्ह्यांची कामगिरी निच्चांकी!

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद आहे. मात्र, या सहा जिल्ह्यांची कामगिरी पाहिली तर ती निच्चांकी पातळीवर आहे. एक माणूस सहा-सहा जिल्हे कसे सांभाळू शकतो. तेथील लोकांचे प्रश्न सुटणार आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणतात मी समर्थ आहे. मी म्हणतो ते राज्यातील ३६ जिल्हे सांभाळू शकतील. त्यांचे नेतृत्व मोठं आहे. मला ते कमी करायचं नाही. पण विदर्भातील या सहा जिल्ह्यांची गेल्या ९ महिन्यातील कामगिरी पाहिली तर निच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. याकडे तुम्ही गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. तुम्ही केवळ ४० आमदारांना सांभाळत आहात. मात्र, राज्यातील जनतेकडे दुर्लक्ष करत आहे, अशी सणसणीत चपराक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी लगावली.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याच विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी महाविकास आघाडी काळातील विकासकामे आणि आता भाजप-शिंदे गटाच्या सरकारची गेल्या नऊ महिन्यातील कामांची चिरफड केली. अजित पवार म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकारचे नव्याचे नऊ दिवस संपले आहेत. आता नऊ महिने झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. एका-एका मंत्र्याकडे सहा-सहा जिल्ह्यांचा कारभार दिल्यावर ते कसे न्याय देतील, असा साधा प्रश्न पडत नाही. किमान आकडेवारी तरी पाहण्याचे कष्ट घ्या म्हणत अजित पवार यांनी सरकारच्या डोळ्यात अंजन घातले.

Sanjay Kakde म्हणतात… अजित पवार यांचे उपकार विसरता येणार नाही!

अजित पवार म्हणाले की, लोकप्रिय घोषणा टाळून ठोस उपाययोजना करणारा आणि उत्तरदायित्वाला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प असेल अशी राज्यातल्या जनतेची अपेक्षा होती. मात्र राज्याच्या अर्थसंकल्पाने सर्वसामान्य जनतेची घोर निराशा झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सारख्या हुशार अर्थमंत्र्यांच्याकडून अनेक अपेक्षा होत्या मात्र फडणवीस सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यांच्याकडे विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा या सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री पद आहे. मात्र, सहा जिल्ह्यांची गेल्या ९ महिन्यांतील कामगिरी अत्यंत सुमार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube