Download App

A समरी रिपोर्ट सादर करा; अनिल देशमुखांचा फॉरेन्सिक रिपोर्टबद्दल मोठा खुलासा

Anil Deshmukh : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी दरम्यान प्रचार करत असताना राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला होता.

  • Written By: Last Updated:

Anil Deshmukh : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी दरम्यान प्रचार करत असताना राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्यात अनिल देशमुख यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली होती. मात्र आता ही घटना खोटी होती असा दावा नागपूर ग्रामीण पोलिसांनी केला आहे. फॉरेन्सिक तपासात संबंधित घटना खोटी असल्याचं नागपूर ग्रामीण पोलिसांनी म्हटले आहे. नागपूर पोलिसांच्या या दाव्यानंतर आता अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहे.

पत्रकारांशी बोलताना अनिल देशमुख (Anil Deshmukh) म्हणाले की, निवडणुकीच्या काळात माझ्या गाडीवर झालेल्या दगडफेकीत काच मला लागून मी जखमी झालो मात्र फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये (Forensic Report) माझ्या गाडीवर हल्ला झाला, एका व्यक्तीने मोठ दगड समोरच्या काचेवर मारलं, दुसऱ्या व्यक्तीने लहान दगड मारले असे नमूद आहे. मी लवकरात लवकर फॉरेन्सिक रिपोर्ट जनतेपुढे आणणार आहे असं पत्रकारांशी बोलताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

पुढे बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, ज्यांनी माझ्या गाडीवर दगडफेक केली त्या आरोपींना पोलिसांनी पकडायला हवे होते मात्र सुरुवातीपासूनच या घटनेला राजकीय रंग देण्यात येत आहे आणि आता बी समरी रिपोर्ट सादर केला जात आहे. आरोपी सापडले नाहीत म्हणून A समरी रिपोर्ट सादर करायला हवा होता असं देखील यावेळी अनिल देशमुख म्हणाले.

Bandu Andekar House : पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये; बंडू आंदेकरच्या घरावर ‘बुलडोझर’ कारवाई

ही घटना झाल्यानंतर लगेचच पोलीस अधीक्षकांनी (Nagpur Police) कोणत्याही रिपोर्टची वाट न पाहता राजकीय दबावा पोटी या घटनेबद्दल त्यांनी उल्लेख केला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, ही जी घटना आहे ती सलीम जावेदची स्टोरी आहे. सुरुवातीपासून या घटनेला राजकीय रंग देण्यात येत असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला.

follow us