Download App

विद्यार्थ्यांच्या एकजुटीला यश! आंदोलनानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय अखेर झालाच

Maharashtra Public Service Commission ची मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे. आयोगाकडून ट्वीट करत ही घोषणा करण्यात आली.

Success to Student protest, the decision to postpone the State Services Mains Examination : राज्य सेवेची मुख्य परीक्षा दिवस पुढे ढकलवावी यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या पुण्यातील विद्यार्थ्यांनी 11 एप्रिलला पुन्हा एकदा रस्त्यावर उतरुन ठिय्या आंदोलन (MPSC Students Protest) केलं. अखेर या आंदोलनाला यश आलं आहे. कारण आता राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे आता ही परीक्षा 26, 27 आणि 28 मे रोजी होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ट्वीट करत ही घोषणा करण्यात आली आहे.

गालावरुन वारं गेलं, चांगली वाणी बंद, धनंजय मुंडेंसाठी प्रार्थना करा; महंत नामदेव शास्त्रींकडून पाठराखण

एमपीएससीने आज झालेल्या बैठकीत ही परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार आता 26 ते 28 एप्रिल 2025 या कालावधीत नियोजित मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

साखर कारखान्यांची, बँकांची काय परिस्थिती, माहिती घ्या; जामखेडच्या कार्यक्रमातून अजितदादांनी नगरच्या नेत्यांना घेरले !

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या पुण्यातील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन ठिय्या आंदोलन (MPSC Students Protest) सुरु केलं होतं. अचानक विद्यार्थ्यांनी शास्त्री रस्त्यावर आंदोलन सुरु केल्यानं, इथली वाहतूक विस्कळीत झाली आहे. पण यामुळं पोलिसांची मात्र धावपळ उडाली होती.

follow us