फडणवीसांची गुगली; अर्थखात्यासाठी अजितदादांची चर्चा असतानाच मुनगंटीवारांना धाडलं दिल्ली दौऱ्यावर

दिल्ली : शिंदे सरकारमध्ये नव्याने दाखल झालेल्या राष्ट्रवादीच्या (NCP) मंत्र्यांना अद्याप खातेवाटप जाहीर करण्यात आलेलं नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह सर्व 9 जण बिनखात्याचे मंत्री म्हणून काम करत आहेत. अशातच मागील काही दिवसांपासून अर्थखातं अजित पवार यांच्याकडे जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र अजितदादांना कोणत्याही परिस्थितीत अर्थ खाते देऊ नये अशी शिंदे गटाची मागणी […]

Ajit Pawar Devendr Fadnavis

Sudhir Mungantiwar along with Finance Minister Devendra Fadnavis from Maharashtra attended the GST Council meeting in Delhi.

दिल्ली : शिंदे सरकारमध्ये नव्याने दाखल झालेल्या राष्ट्रवादीच्या (NCP) मंत्र्यांना अद्याप खातेवाटप जाहीर करण्यात आलेलं नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह सर्व 9 जण बिनखात्याचे मंत्री म्हणून काम करत आहेत. अशातच मागील काही दिवसांपासून अर्थखातं अजित पवार यांच्याकडे जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र अजितदादांना कोणत्याही परिस्थितीत अर्थ खाते देऊ नये अशी शिंदे गटाची मागणी आहे. (Sudhir Mungantiwar along with Finance Minister Devendra Fadnavis from Maharashtra attended the GST Council meeting in Delhi.)

अशातच देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांमध्ये ट्विस्ट आणला आहे. आता अर्थखात्यासाठी अजितदादांसह सुधीर मुनगंटीवार यांचीही चर्चा सुरु झाली आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये आज (11 जुलै) जीएसटी कौन्सिलची बैठक पार पडणार आहे. खुद्द फडणवीस यांनी मुनगंटीवार यांना या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीसाठी दिल्लीला पाठवलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडत आहे. सर्व राज्यांमधील अर्थमंत्र्यांची या बैठकीला उपस्थिती असणार आहे.

महाराष्ट्र कॉंग्रेसमध्ये खांदेपालट होणार? दिल्लीत खरगे अन् राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक

सध्या अर्थमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. मात्र तरीही त्यांनी मुनगंटीवार यांना अर्थमंत्र्यांचा प्रतिनिधी म्हणून पाठवल्याने अर्थखातं आता त्यांच्याकडे येणार का? असा सवाल विचारला जात आहे. यापूर्वीच्या फडणवीस सरकारमध्ये मुनगंटीवार यांच्याकडे अर्थखातं होते. त्यामुळे या चर्चांना हवा मिळाली आहे.

Kupte Tithe Gupte या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस भडकले? काय आहे नेमकं कारण? Video

दरम्यान दुसरीकडे राज्यात अगोदरच शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार मागील अनेक दिवसांपासून रखडला आहे. अशात आता शिंदे सरकारमध्ये अजित पवारांची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये खाते वाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. सोमवारी रात्री उशीरा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी बैठक पार पाडली. यामध्ये खाते वाटपावर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.

 

Exit mobile version