Video : माझा काहीतरी स्तर ठेवा; राऊतांच्या प्रश्नावर उत्तर देताना भर कार्यक्रमात फडणवीस संतापले
Devendra Fadanvis in Kupte tithe gupte: ‘खुपते तिथे गुप्ते’ (Kupte Tithe Gupte)या कार्यक्रमाचं तिसरं पर्व ४ जूनपासून सुरु झाले आहे. या कार्यक्रमाचा प्रोमो सध्या जोरदार धुमाकूळ घालत असल्याचे दिसत आहे. या प्रोमोमध्ये (Promo Viral) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी यावेळी उपस्थिती लावली आहे. याअगोदर राज ठाकरे, नारायण राणे, नितीन गडकरी यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी मनमोकळ्या गप्पा मारल्याचे दिसून येत आहे. त्यावेळी त्यांना काही खुपणारे प्रश्न विचारण्यात आले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देणार धारदार प्रश्नांना सडेतोड प्रत्युत्तरे…
‘खुपते तिथे गुप्ते’,
16 जुलै, रविवार, 9 PM#khuptetithegupte #ZeeMarathi@AvadhootGupte @Dev_Fadnavis pic.twitter.com/o8Vkmc7MRO— Zee Marathi (@zeemarathi) July 10, 2023
अभिनेता अवधुत गुप्ते (Avadhoot Gupte) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक प्रश्न विचारला आहे. साधे, कर्तव्यदक्ष आणि सरळ विरोधक कोणते वाटतात? केजरीवाल की उद्धव ठाकरे? असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारलं असता. त्यावर त्यांनी दोघंही मला जिलेबीसारखे सरळ वाटतात, असा खोचक टोला त्यांनी यावेळी लगावला आहे. या कार्यक्रमाचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे.
या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊत यांचा एक व्हिडिओ दाखवण्यात आला. त्यामध्ये संजय राऊत यांनी फडणवीसांवर ५०० कोटी रुपयांचा आरोप केला आहे. त्याला प्रत्युत्तर देत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भडकल्याचे दिसून आले आहे. उलट संजय राऊतांवर १ हजार कोटी रुपयांचा आरोप आहे. ईडी कुठंय? असा उलट प्रश्न फडणवीस अवधुत गुप्तेला करत असताना दिसत आहेत.
आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?
मला वाटलं नव्हतं तुम्ही अशाही माणसाला उत्तर द्यायला सांगाल, माझा स्तर ठेवा, असं म्हणत फडणवीस चांगलंच भडकल्याचे दिसून आले आहेत. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचे दिसत आहे. दरम्यान महाराष्ट्राचा कोणता युवानेता संयमी, अभ्यासू, दूरदर्शी वाटतो? असंही देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आलं. या प्रश्नावर मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काहीसे बुचकाळ्यात पडल्याचे दिसून आले आहेत. या प्रोमोमध्ये सस्पेन्स ठेवण्यात आला आहे. यामुळे आता देवेंद्र फडणवीस नेमकं कोणाचं नाव घेणार? यावर सर्वांना मोठी उत्सुकता लागल्याचे दिसून येत आहे.