संतापजनक! ऊस वाहतूक ट्रॅक्टर चालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

या घटनेनंतर आरोपी सूरज फरार झाला होता. पोलीस त्याच्या शोधात ठिकठिकाणी धाडी टाकत होते.

Women Rape On Youngster

संतापजनक! ऊस वाहतूक ट्रॅक्टर चालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

बीडमध्ये ट्रॅक्टर चालकाने ऊसतोड (Beed) मजुराच्या 13 वर्षीय चिमुरडीला कोयत्याचा धाक दाखवून दोनदा अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. त्याच्यावर या कृत्यानंतर कारवाई करण्यात आली. तो फरार झाला होता. परंतु, करणाऱ्या या नराधमाने पोलिसांच्या दबावामुळे अखेर शरणागती पत्करली आहे. या घटनेने ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, संपूर्ण जिल्ह्यात या अघोरी कृत्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना केज तालुक्यात उघडकीस आली आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या एका नराधम ट्रॅक्टर चालकाने एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर कोयत्याचा धाक दाखवून दोन वेळा अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणातील मुख्य आरोपी सूरज अशोक खरात (वय 22, रा. जामरुन, जि. परभणी) हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता, मात्र अखेर तो पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे.

बीड जिल्ह्यात संतापजनक घटना! अल्पवयीन मुलीवर घराशेजारी राहणाऱ्या वृद्धाचा अत्याचार

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही ऊसतोड मजूर कुटुंबातील असून तिचं वय अवघं 13 वर्षे 8 महिने आहे. आरोपी सूरज खरात हा त्याच ऊसतोड टोळीमध्ये ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता. ओळखीचा फायदा घेत त्याने पीडितेवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केले.

पहिली घटना

14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास सुर्डी (सोने सांगवी) शिवारातील रोडगे यांच्या शेतात आरोपीने पीडितेला गाठलं. तिथे तिला कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला.

दुसरी घटना

या घटनेनंतरही आरोपीचा धाक संपला नव्हता. 8 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास केज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हदगाव डोका शिवारातील बनसोडे यांच्या शेतात त्याने पुन्हा त्याच मुलीला कोयत्याचा धाक दाखवून अत्याचार केला.

वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून पीडितेने आपल्या आईला आपबिती सांगितली. त्यानंतर पीडितेच्या आईने धीर धरून 10 फेब्रुवारी रोजी युसुफवडगाव पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार दिली. या तक्रारीवरून आरोपी सूरज अशोक खरात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

गुन्हा दाखल झाल्याचं समजताच आरोपी सूरज फरार झाला होता. पोलीस त्याच्या शोधात ठिकठिकाणी धाडी टाकत होते. पोलिसांचा वाढता दबाव आणि अटकेची भीती यामुळं अखेर आरोपी सूरज स्वतःहून बीड येथील ‘पिंक पथका’चे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके यांच्यासमोर हजर झाला. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके करत आहेत.

Exit mobile version