Download App

धक्कादायक! खासगी बँकेने छळलं; मुलीच्या लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या बापाची बँकेसमोर आत्महत्या

सुरेश जाधव यांची ११ लाख रुपयांची ठेव बँकेत ठेवल्याची माहिती मिळाली आहे. वारंवार पैसे मागूनही बँकेकडून पैसे दिले जात

  • Written By: Last Updated:

Suicide In Front of Bank in Beed District : बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Beed) जिल्ह्यातील गेवराई शहरात मुलीच्या लग्नाचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या बापाने खासगी बँकेसमोरच गळफास घेत आत्महत्या केली आहे. गेवराईमधील छत्रपती मल्टीस्टेट या खासगी बँकेसमोर ठेवीदाराने गळफास लावून आत्महत्या केली. सुरेश आत्माराम जाधव असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे.

सुरेश जाधव यांची ११ लाख रुपयांची ठेव बँकेत ठेवल्याची माहिती मिळाली आहे. वारंवार पैसे मागूनही बँकेकडून पैसे दिले जात नसल्याने जाधव यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याची माहिती मिळाली. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

Video : राज ठाकरे हिंदी भाषा सक्तीवरून पुन्हा आक्रमक; सर्व शाळांच्या मुख्यध्यापकांना लिहलं पत्र

जाधव यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. पोलिासांनी मृतदेह पोस्टमार्टम करण्यासाठी पाठवला असून पुढील तपास करण्यात येत आहे. रक्कम किती होती आणि याबाबतची इतर संपूर्ण माहिती घेऊन रीतसर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती गेवराई पोलिसांनी दिली आहे. या प्रकारानंतर गेवराईमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बीडच्या गेवराई तालुक्यातील खळेगाव मधील ठेवीदार सुरेश आत्माराम जाधव यांनी छत्रपती मल्टीस्टेट बँकेच्या गेटला गळफास घेऊन आत्महत्या केली. जाधव यांच्या छत्रपती मल्टीस्टेट बँकेत ११ लाख आणि ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये ५ लाख रुपये अडकले होते. मुलीच्या लग्नासाठी पैशांची गरज होती. मात्र, सतत बँकेच्या फेऱ्या मारूनही त्यांना रक्कम परत मिळाली नाही. या मानसिक त्रासामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.

follow us

संबंधित बातम्या