Download App

मोठी बातमी! शिर्डीत सुजय विखेंचे बॅनर फाडले

माजी खासदार सुजय विखे यांचे बॅनर अज्ञातांकडून फाडण्यात आले असल्याची घटना समोर आली आहे.

  • Written By: Last Updated:

Sujay Vikhe Banner Torn In Shirdi : अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी मतदार संघातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. माजी खासदार सुजय विखे यांचे बॅनर अज्ञातांकडून फाडण्यात आले असल्याची घटना समोर आली आहे. त्याचबरोबर परिसरातील काही वाहनांचं नुकसान देखील करण्यात आले आहे. आता या घटनेमुळे शिर्डी मतदार संघात राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे.

सुजय विखे पाटील यांचे बॅनर फाडल्याची घटना

शिर्डी (Shirdi) शहरातील लक्ष्मीनगर परिसरात अज्ञातांनी भाजपचे (BJP) माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) पाटील यांचे बॅनर फाडल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच या भागातील काही दुचाकी वाहनांचीही तोडफोड करण्यात आली आहे. हा प्रकार काल सोमवारी रात्री उशिरा घडला.

राजकीय वर्तुळात खळबळ

घटनेनंतर सुजय विखे यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने शिर्डी पोलीस (Ahilyanagr Politics) ठाण्यात धाव घेतली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. या प्रकारामुळे शिर्डीत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून समर्थकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ही तोडफोड का करण्यात आली? याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रकारामागे नेमक कोणं?

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शिर्डी अन् संगमनेरमध्ये राजकीय वातावरण हे चांगलेच तापलेलं दिसून येत आहे. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात आणि आमदार अमोल खताळ यांच्यामध्ये राजकीय वाद टोकाला जाऊ लागलेले आहे. तसेच संगमनेरमध्ये झालेले राजकीय बदल, निवडणुकीतील निकालानंतर विखे आणि थोरात यांच्यामध्ये देखील शाब्दिक चकमक उडताना दिसून येत आहे. यामुळे शिर्डीमध्ये घडलेल्या या प्रकारामागे नेमक कोणं आहे? याबाबत तर्क वितर्क लावले जात आहे.

घटनेवर सुजय विखे काय म्हणाले?

अहिल्यानगरमध्ये भाजपच्या वतीने कार्यशाळांच आयोजन करण्यात आले होते . याप्रसंगी माजी खासदार सुजय विखे हे देखील उपस्थित होते. या घटनेवर बोलताना सुजय विखे म्हणाले, भयमुक्त शिर्डी आणि भयमुक्त अहिल्यानगर आपण करणार. तसेच असे कृत्य करणाऱ्या गुंडशाही मोडून काढणार, अशी प्रतिक्रिया यावेळी सुजय विखे यांनी दिली.

follow us