Rahuri Municipal Council : राहुरी नगरपरिषदवर कमळ फुलणार…, विखेंचा मास्टर प्लॅन

Rahuri Municipal Council :  राहुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीचा पारा चांगलाच तापला. भाजपकडून विखे व कर्डीले गटाने तनपुरे गटाच्या विकास आघाडी

Sujay Vikhe

Sujay Vikhe

Rahuri Municipal Council :  राहुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीचा पारा चांगलाच तापला. भाजपकडून विखे व कर्डीले गटाने तनपुरे गटाच्या विकास आघाडी विरोधात मोट बांधली आहे. भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी देत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे यांनी राहुरीत मास्टर प्लॅन आखला आहे. काही दिवसांपूर्वी विखे यांनी राहुरीत डाव टाकत तनपुरे यांचे कट्टर समर्थक असलेल्या एकाला आपल्या गोटात सामील केले.

राहुरी नगरपरिषदचे माजी नगरसेवक आणि रावसाहेब चाचा तनपुरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे सुनील ठकाजी पवार यांनी मंत्री विखे पाटील उपस्थितमध्ये भाजपात (BJP) प्रवेश केला. भाजपने नगराध्यक्षपदासाठी पवार यांना उमेदवारी दिली. यामुळे तनपुरेंच्या साम्राज्याला विखे सुरुंग लावत असल्याचे देखील बोलले जात आहे.

राहुरी नगरपरिषदेसाठी (Rahuri Municipal Council) रणधुमाळी पेटलेली आहे. माजी खासदार प्रसाद तनपुरे, डॉ. उषाताई तनपुरे, सभापती अरुण तनपुरे, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यंदा विकास मंडळाचे रावसाहेब चाचा तनपुरे यांना सोबत घेत विकास आघाडी स्थापन केली. तर दुसरीकडे मंत्री राधाकृष्ण विखे व माजी खासदार सुजय विखे यांच्या नेतृत्वात नगर जिल्ह्यात महायुतीने विधानसभा गाजवली. त्यानंतर आता स्थानिकच्या माध्यमातून विखे यांनी राहुरीमध्ये राजकीय डाव टाकण्यास सुरुवात केली आहे.

डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) व कर्डिले गटाने राहुरीच्या नगरपरिषदेमध्ये लक्ष घालत नवयुवकांच्या पाठीवर पाठबळाची थाप देत निवडणुकीत फळी उभारली. त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये विखे व तनपुरे यांच्यामध्येच थेट सामना होणार असे बोलले जातंय. राहुरी नगरपरिषद निवडणुकीत तनपुरे गटाकडून शिक्षक म्हणून ओळख असणारे भाऊसाहेब मोरे यांचा नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल करण्यात आला.

तर त्यांचा थेट सामना भाजपचे सुनील ठकाजी पवार यांच्याशी होणार आहे. राहुरी निवडणुकीचे चित्र राहुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद एसटी प्रवर्गातील पुरुषासाठी आरक्षित होताच सर्वसाधारण प्रवर्गातील अनेक इच्छुकांच्या आशेवर पाणी फेरले.

रावणाची लंकाही अहंकारामुळे जळून खाक, एकनाथ शिंदेंची नाव न घेता भाजपवर टीका 

12 प्रभागातून 24 नगरसेवकांची निवड होणार आहे. त्यात 12 जागा महिलांसाठी राखीव असणार आहे. यामुळे या अनिवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे आहे. विखे यांच्या निवडणुकींमधील एन्ट्रीने तनपुरे समर्थकांमध्ये धाकधूक पाहायला मिळत आहे.

Exit mobile version