Download App

कार्यक्रमाला राजकीय स्वरुप, शिवराज्याभिषेक सोहळ्यातल्या प्रकारावर सुळेंचा संताप

Shivrajyabhishek Din : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्यभिषेक सोहळ्यात घडलेल्या प्रकाराचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध करण्यात आला आहे. सोहळ्यामध्ये खासदार सुनिल तटकरे यांना प्रोटोकॉलनूसार बोलू न दिल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. सुळेंनी याबाबत ट्विट करत घडलेल्या प्रकाराचा निषेधही केला आहे.

रायगड किल्ल्यावर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्यभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. हा शासकीय कार्यक्रम होता मात्र, या कार्यक्रमाला राजकीय स्वरुप देण्यात आल्याचं खासदार सुप्रिया सुळेेंनी म्हटलं आहे. राज्य शासनाच्या कार्यक्रमात रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांना प्रोटोकॉलनूसार सन्मान देणं ही शासनाची जबाबदारी आहे, या शब्दांत सुळेंनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावलं आहे.

बाबासाहेबांचे म्हणणे प्रकाश आंबेडकरांना मान्य नाही का?; भुजबळांचा खोचक सवाल

दरम्यान, सोहळा साजरा होत असतानाच दुसऱ्या बाजूला या कार्यक्रमामध्ये नाराजी नाट्य पहायला मिळालं. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंना कार्यक्रमात बोलू न दिल्याने नाराज झाले. कार्यक्रमामध्ये राजशिष्टाचाराचे पालन न झाल्याचा आणि आयोजनातील त्रुटींवर बोलू न दिल्याचा आरोप करत ते कार्यक्रमातून तडक निघून गेले.

Junior Hockey Asia Cup : भारताच्या युवा ब्रिगेडने पाकिस्तानचा पराभव करत ज्युनियर हॉकी एशिया कप जिंकून रचला इतिहास

देशात 542 खासदार आहेत. त्यापैकी मी एक आहे. रायगडचा खासदार म्हणून बोलण्याची संधी द्यायला हवी होती. हा राज्य सरकारचा कार्यक्रम होता. पण ज्याप्रकारे स्वयंघोषित स्वागताध्यक्षांनी कार्यक्रम हातात घेतला ते बरोबर नसल्याचं ते म्हणाले आहेत.

वन्यप्राण्यांकडून शेतीचे नुकसान झाल्यास शेतकऱ्याला नुकसान भरपाई

या प्रकारावर मंत्री दीपक केसरकरांनी प्रतिक्रिया देत हा छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेकाचा 350 वा सोहळा होता. हा कुणाच्या मान-अपमानाचा सोहळा नाही. हा छत्रपतींचा सोहळा असून प्रत्येकाने लीनपणे यात सहभागी झाले पाहिजे, असं म्हटलं होतं.

दरम्यान, घडलेल्या प्रकारावर सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त करताना हा प्रकार अतिशय खेदजनक असल्याचं म्हटलं आहे. तसेच झाल्या प्रकाराचा निषेधही सुळे यांनी केला आहे.

Tags

follow us