सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच खातेवाटपही जाहीर, कोणत्या विभागाची दिली जबाबदारी?

आज सायंकाळी त्यांचा शपथविधी पार पडला. यावेळी राष्ट्र्वादीचे प्रमुख नेते, आमदार आणि महायुतीचे नेते उपस्थित होते

News Photo   2026 01 31T183741.054

सनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच खातेवाटपही जाहीर, कोणत्या विभागाची दिली जबाबदारी?

सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. (Ajit Pawar) आज सायंकाळी त्यांचा शपथविधी पार पडला. यावेळी राष्ट्र्वादीचे प्रमुख नेते, आमदार आणि महायुतीचे नेते उपस्थित होते. त्यानंतर आता त्यांच्याकडे 3 महत्त्वाची खाती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. क्रीडा आणि युवक कल्याण, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्यांक खातं सुनेत्रा पवार यांनी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

क्रीडा आणि युवक कल्याण, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्यांक या खात्याची सुनेत्रा पवार यांच्याकडं जबाबदारी देण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अजित पवारांकडे असलेले अर्थखाते सुनेत्रा पवार यांच्याकडं देण्यात आलेलं नाही. समोर आलेल्या माहितीनुसार हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्याकडंच ठेवणार असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादीचे नेते हे खाते आमच्या पक्षाला मिलावं अशी मागणी करत असल्याचं समोर आलं आहे.

सुनेत्रा पवार महाराष्ट्रातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; पण देशात कितवा नंबर ?

राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी थोड्या वेळापूर्वी शपथ घेतली आहे. आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांच्यासह राष्ट्रवादीचे मोठे नेते उपस्थित होते.

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्याकडे महायुती सरकारमधील तीन खाती देण्यात आली आहेत. सुनेत्रा पवार आता बारामतीला रवाना होणार असल्याची माहिती आहे. अजित पवारांच्या दहाव्याचा कार्यक्रम होईपर्यंत सुनेत्रा पवार बारामतीत राहणार आहेत. यावेळी त्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेतील. मात्र, हार -बुके स्वीकारणार नसल्याची माहिती आहे.

 

Exit mobile version