Raj Thackeray : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. बीडमध्ये आरक्षणाच्या मुद्यावरून मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या ताफ्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या (Uddhav Thackeray Shiv Sena) कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्या आहे.
विधानसभा निवडणुकांपूर्वी मराठवाड्यात राज ठाकरेंचा दौरा सुरु आहे. आज बीडमध्ये राज ठाकरे दाखल झाले होते मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला तसेच राज ठाकरे यांना सुपारीबाज म्हणत त्यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्या. तर दुसरीकडे या प्रकरणानंतर मनसेकडून देखील ठाकरे गटाला इशारा देण्यात आला आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी व्हिडिओ शेअर करत ताफा अडवणाऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे. उबाठा सगळ्या महाराष्ट्र सैनिकांकडून सांगत आहे, सुरूवात तुम्ही केली आता शेवट आम्ही करणार आहे. असं संदीप देशपांडे यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं म्हटलं होते. मात्र राज ठाकरेंनी मराठा आरक्षणाबाबत चुकीची भूमिका घेतली आहे आणि आरक्षणाविरोधात बोललेलं आम्ही सहन करणार नाही असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे.
श्री. उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी आज मराठवाड्यात नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान राजसाहेबांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर येऊन जो थिल्लरपणा केला त्यावर पक्षाचे नेते, प्रवक्ते संदीप देशपांडे यांची जळजळीत प्रतिक्रिया…#MNSAdhikrut pic.twitter.com/Ouabc8BYN8
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 9, 2024
Vinesh Phogat: … तर विनेश फोगटला अपात्र ठरवणे योग्य होते, सचिन तेंडुलकरचं ट्विट व्हायरल
नेमकं घडलं काय?
बीडमध्ये आज राज ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर ठाकरे गटाकडून त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यानंतर राज ठाकरे यांना सुपारीबाज म्हणत त्यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकण्यात आले. त्यानंतर ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा देखील झाला त्यानंतर पोलिसांनी राज ठाकरे यांच्या ताफ्याला वाट करून दिली.