“देशपांडेच्या जीवाला किंमत आणि श्री सदस्यांचा जीव…” संदीप देशपांडेचं उदाहरण देत अंधारेंचा भाजपला टोला

  • Written By: Published:
“देशपांडेच्या जीवाला किंमत आणि श्री सदस्यांचा जीव…” संदीप देशपांडेचं उदाहरण देत अंधारेंचा भाजपला टोला

“देशपांडेचा जीवाला किंमत आहे आणि श्री सदस्यांचा जीव भाजपच्या लेखी कस्पटासमान आहे का?” अशी टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज भाजपवर केली आहे. Maharashtra Bhushan Award ceremony : रविवारी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान करण्यात आला. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 13 जणांचा उष्माघाताने (heat stroke) मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले.

यानंतर या कार्यक्रमाच्या जंगी आयोजनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या कार्यक्रमात उष्मादाहामुळे झालेल्या मृत्यूवरून सरकार टीकेचं धनी ठरत आहे. याच मुद्द्यावरून सुषमा अंधारे यांनी देखील जोरदार टीका केली आहे.

Jitendra Awhad : आप्पासाहेब धर्माधिकारींचं नाव बदनाम करु नका…

सुषमा अंधारे यांनी लिहलं आहे की, “संदीप देशपांडे नामक एका माणसाला साधे खरचटले सुद्धा नव्हते तरी सुद्धा भाजप नेत्यांनी रुग्णालयात धाव घेत अक्षरशः प्रचंड गर्दी केली होती. काही तासातच हा देशपांडे नावाचा माणूस एका पार्टीत उड्या मारून नाचत होता.”

त्यांनी यावर पुढे लिहले आहे की, पण श्री सदस्यांच्या एवढ्या संख्येने झालेल्या दुर्दैवी मृत्यूनंतर मृतांच्या कुटुंबीयांना भेट देण्याइतकी साधी मानवीयता सुद्धा भाजपशिंदे नेत्यांनी दाखवली नाही. देशपांडेचा जीवाला किंमत आहे आणि श्री सदस्यांचा जीव भाजपच्या लेखी कस्पटासमान आहे का?” असा रोखठोक सवाल त्यांनी विचारला आहे.

Karnataka Election : राजकीय गणितं बदलणार?; माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर काँग्रेसमध्ये दाखल

दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील यावर टीका केली आहे. सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्वरीत राजीनामा दिला पाहिजे. अशी गंभीर टीका त्यांनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube