नवी दिल्ली : सलग तिसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची (Maharashtra Political Crisis)सुनावणी होणार आहे. महाराष्ट्रातील प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवावं की नाही याचा निर्णय न्यायालय घेणार आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबद्दल सलग 2 दिवस सुनावणी झाल्यानंतर आता पुन्हा आज सुनावणी होणार आहे. मंगळवारच्या सुनावणीमध्ये ठाकरे गटाकडून (Thackeray Group)युक्तिवाद करण्यात आला.
त्यानंतर बुधवारच्या सुनावणीत शिंदे गटाचे वकील हरिश साळवे, नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद मांडला. हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवावं की नाही याबाबत कोर्ट निर्णय घेणार आहे.
राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार : रोहित पवार यांना लागली चाहूल
हरिश साळवे यांनी 45 मिनिटे युक्तिवाद केला. नबाम रेबिया खटल्याचा निकाल ती या प्रकरणाला लागू करावी अशी मागणी केली. राज्यपालांच्या बाजूने वकिलांनी कोर्टात बाजू मांडली. प्रत्येक सदस्यांचे हक्क आणि अधिकार यांच्याबाबत चर्चा झाली.
त्याशिवाय मंगळवारच्या युक्तिवादात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एकमेकांशी चर्चाविनिमय करत होते. आता आज सर्वोच्च न्यायालयात काय होणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.