Download App

अर्थिक परिस्थिती बेताची अन् शेतकऱ्यांचाही विरोध; शक्तिपीठ महामार्गवरून सुळेंचा सवाल

Supriya Sule यांनी राज्यामध्ये सरकारकडून शक्तिपीठ महामार्ग हा महत्त्वाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यावरून राज्यसरकारवर टीका केली आहे.

Supriya Sule creticize Government on Shaktipeeth Highway : राज्यामध्ये सरकारकडून शक्तिपीठ महामार्ग (Shaktipeeth Highway) हा महत्त्वाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मात्र यावरून विरोधकांसह ज्या शेतकऱ्यांच्या यामध्ये जमीनींचं अधिग्रहण केलं जात आहे. त्यांचा देखील विरोध होत आहे. त्यावर आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांनी राज्यसरकारवर टीका केली आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

सरकार संदर्भात चिंता जनक बातमी अनेक पेपरमध्ये आली आहे. सरकारने हाती घेतलेल्या महारष्ट्रामधील अजुन एका प्रकल्पाला (Shaktipeeth Highway) सगळ्यांचा विरोध आहे. कारण राज्याची अर्थिक स्थिती नसताना यासाठी सरकारने तब्बल 30 हजार कोटी कर्ज घेतले आहे. त्यावर महाराष्ट्र सरकारला 8.85 टक्के इतका इंट्रेस्ट लावला आहे. त्यामुळे याला विरोध आहे. 22 टक्के बजेट हे द्विमेंपँट मध्ये जाईल. दुसरीकडे मात्र शाळा जलजीवन आरोग्य सह इतर विभागाचे पगार वेळेत होत नाही. ⁠एमएसआरसिटाय लोन सरकार घेत आहे. हे सर्व नंबर पेपरमध्ये आले आहेत.

Video : राज ठाकरेंनी हिंदी सक्तीविरोधात दंड थोपटले; 6 जुलैचा मुहूर्त निवडत सरकारला दाखवणार ताकद

⁠त्यामुळे शेतकऱ्यांना हा रस्ता (Shaktipeeth Highway) नको आहे. हा प्रोजेक्ट झाला तर महाराष्ट्र अधिक अडचणीत येईल. महाराष्ट्र सरकारचे डॉक्युमेंट पाहा. विरोध होतोय अर्थिक परिस्थिती बेताची असताना लोन घेऊन प्रोजेक्ट कशाला केले जात आहेत. फायनान्स घेत असताना गांभीर्याने विचार करावा. ह्या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांना सरकार भरपाई द्यायची असती. हा कायदा आहे. ⁠चार पट अधिकार शेतकऱ्यांना दिले पाहिजे. पैसे देतात म्हणजे उपकार करत नाहीत.

यशराज फिल्म्सचा चित्रपट वॉर 2 जागतिक स्तरावर प्रदर्शित होणार; नवीन पोस्टर्ससह 50 दिवसांची उलटी गणती सुरू

शेतकऱ्यांना जमिनी (Shaktipeeth Highway) विकायची नाही. ⁠खिशात पैसे नाही. हे फायनान्स मिन्स्ट्री म्हणते 22 टक्के बजेट इंट्रेस्ट भरण्यात जाणार असेल तर राज्याची प्रगती कशी होणार? फायननस मिनिस्ट्रीची नोट्स आहे त्यावरून मी बोलते. अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

follow us