Download App

..अन्याय होतोय पण काहीही करता..,वर्धापन दिन्याच्या पुर्वसंध्येला सुप्रिया सुळेंच स्टेटस

'आपली बाजू कितीही खरी असली तरी आपल्यावर अन्याय होतो. त्यावेळी आपण काहीही करू शकत नाही' असं सुप्रिया सुळे म्हणतात.

Supriya Sule whatsapp Status : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या व्हॉट्स अॅपला ठेवलेल्या स्टेटसची चर्चा जोरदार सुरू आहे. (Sule) ‘आपल्यावर अन्याय होत असताना सहन करायला शिक’ असं सुप्रिया सुळेंनी त्यात म्हटलंय. त्यामुळे सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणाकडं आहे? त्यांना नेमका काय संदेश द्यायचा आहे? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

‘आपली बाजू कितीही खरी असली तरी आपल्यावर अन्याय होतो. त्यावेळी आपण काहीही करू शकत नाही’ असं सुप्रिया सुळे म्हणतात. त्यामुळे घट्ट व्हायचं आणि सहन करायचं असंही सुळे यांनी त्यांच्या व्हॉट्स अॅप स्टेटसमध्ये म्हटलंय. 10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आहे. त्याआधी सुप्रिया सुळेंनी हे स्टेटस ठेवलं आहे. त्यामुळे सुप्रिया सुळेंना नेमकं काय म्हणायचं आहे याचे अर्थही लावले जात आहेत.

मोठी बातमी! ठाकरेंना डबल केसरी’चा जय महाराष्ट्र, चंद्रहार पाटलांचा शिंदे गटात प्रवेश

सहन करायला शिक. आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असतो, आपण प्रयत्न करत राहायचे. त्यावर आपली बाजू कितीही खरी असली तरी अन्याय होत असतो. आपण काहीही करु शकत नाही. परिस्थिती आपल्या हातात नसते, तेव्हा घट्ट व्हायचं आणि सहन करायचं. कर्तव्य करत राहायचं. आपले संस्कार कधीही विसरायचं नाही.

आईला सगळंच माहिती असते…
माझे पालक क्वचितच मला सल्ला देतात…
आईने मला जो सल्ला दिला, तिच गोष्ट मी रोज स्वतःला सांगते… सहन करायला शिक

‘आपली बाजू सत्य असली तरी घट्ट व्हायचं आणि सहन करायचं’ असं म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणाकडे आहे? त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे? अजितदादांना उद्देशून त्यांनी काय म्हटलंय का? अशा अनेक प्रश्नांची चर्चा सध्या सुरू आहे.

महत्त्वाचं म्हणजे 10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा 26 वा वर्धापनदिन साजरा केला जात आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट हे हा वर्धापनदिन वेगवेगळे साजरे करणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळेंनी भावनिक स्टेटस ठेवलं आहे. त्याचे तर्क-वितर्क लावले जात आहेत.

बारामतीचे पवार कुटुंबीय सहसा भावनिक होत नाही, सार्वजनिकरित्या तर कधीच होत नाहीत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी जरी भावनिक स्टेटस ठेवले असले तरी त्यामागे काहीतरी राजकारण नक्कीच असेल अशी चर्चा आहे.

follow us