Download App

येत्या काळात केंद्रात सुळे तर राज्यात जयंत पाटील अन् रोहित पवार मंत्री होतील; लक्ष्मण हाकेंचा मोठा दावा

Laxman Haake यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुळे, जयंत पाटील आणि रोहित पवा केंद्र आणि राज्यात मंत्री होणार असल्याचा दावा केला आहे.

Supriya Sule in center Jayant Patil and Rohit Pawar ministers in the state; Laxman Haake’s big claim : राज्यामध्ये गेल्या चार ते पाच वर्षांपासून राजकीय भूकंप कधी आणि कसा होईल? याचा कोणताही अंदाज लावला जावू शकत नाही. त्यातच आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाबाबत मोठा दावा केला आहे. त्यामुळे राज्यात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. हाके यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे खासदार आणि वरिष्ठ नेते सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि रोहित पवार हे केंद्र आणि राज्यात मंत्री होणार असल्याचा दावा केला आहे.

काय म्हणाले लक्ष्मण हाके?

सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद हवं आहे. तर जयंत पाटील आणि रोहित पवार यांना राज्यात मंत्रिपद हवं आहे. आज ना उद्या ते मंत्री देखील होतील. मात्र याचा मोठा फटका ओबीसीला बसला आहे. कारण त्यामुळे भाजपमधील गोपीचंद पडळकर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांना निवडून येऊनही मंत्रिपद दिलं गेलेलं नाही. त्यांचा केवळ मतांसाठी अपिलींग म्हणून वापर केला जात आहे. पण जेव्हा त्यांना प्रतिनिधी म्हणून मंत्रिमंडळात स्थान द्यायची वेळ आली की, रूसवे फुगवे काढत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

पार्किंगला जागा असेल तरच गाडी खरेदी करता येणार! राज्यात लवकरच येणार पार्किंग पॉलिसी

दरम्यान दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे दोन्ही गट (Ncp Group) एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. खासदार शरद पवार यांनी दिलेल्या एका मुलाखतीत राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याबाबत खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे एकत्र बसून निर्णय घेतली. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चांना बळ मिळालंय. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आतली गोष्ट सांगितलीयं. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येईल असं मला वाटत नसल्याचं संजय राऊतांनी लेटस्अपला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलंय.

पोलीस कर्मचाऱ्याची तीन लाखांची मागणी, भाजप आमदार चव्हाण भडकले, पोलीस ठाण्यात पोहचले अन्…

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले आहेत. शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादीचं एकत्रीकरण होईल असं मला वाटत नाही. शरद पवार यांनी हवेत पतंग उडवला आहे. आधीच राजकारण आणि आत्ताचं राजकारण खूप बदललं असल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलंय.

follow us