पोलीस कर्मचाऱ्याची तीन लाखांची मागणी, भाजप आमदार चव्हाण भडकले, पोलीस ठाण्यात पोहचले अन्…

MLA Mangesh Chavan : गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी एका पोलीस कर्मचाऱ्याने तीन लाख रुपये मागितले आणि तडजोडीनंतर एक लाख रुपये घेतले असल्याचा आरोप भाजपचे (BJP) आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांनी केला. आमदार चव्हाण यांच्या या आरोपानंतर जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे आरोपी पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात यावी या मागणीसाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलीस ठाण्यातच (Police Station) ठिय्या आंदोलन सुरु केला आहे. जेव्हापर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तेव्हापर्यंत पोलीस ठाणे सोडणार नाही असा पवित्रा आमदार चव्हाण यांनी घेतला आहे.
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, भाजप आमदार चव्हाण यांनी चाळीसगाव (Chalisgaon) शहर पोलिसांवर आरोप केले आहे. गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी एका तरुणांकडून पोलीस कर्मचाऱ्यांनी 3 लाख रुपयांची खंडणी मागितली असा आरोप आमदार चव्हाण यांनी केला आहे. या प्रकरणात आमदार चव्हाण यांनी पोलीस अधिकाऱ्यासमोर बसून पैसे देणाऱ्या युवकाशी संवाद साधला. यानंतर पोलीस अधिकाऱ्यानी कारवाई करण्याचे आश्वासन दिले मात्र जोपर्यंत खंडणी घेणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन सोडणार नाही. असा पवित्रा भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी घेतला आहे.
पोलीस अधिकाऱ्याशी संवाद साधताना आमदार चव्हाण म्हणाले की, आताच्या आता त्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करा आणि त्याला अटक करा. पोलीस ठाण्याजवळ अनेक अवैध व्यवसाय सुरु आहे. त्यासंदर्भात कारवाई का होत नाही? असा सवाल आमदार चव्हाण यांनी पोलीस अधिकाऱ्याला विचारला.
नगर शहरातील मेडिकल कॉलेज शिर्डीला नेण्याचा डाव…लंकेंचा अप्रत्यक्ष विखेंना टोला
तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी आमदार चव्हाण यांनी शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जात असल्याचा आरोप करत पंचायच समितीत कर्मचाऱ्यांना जाब विचारला होता.