Supriya Sule : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणाचा सुत्रधार असल्याचा ठपका असलेल्या वाल्मिक कराडने (Walmik Karad) दहशत करून करोडोंची संपत्ती जमवल्याचा दावा केला जातोय. कराडच्या अनेक ठिकाणी मालमत्ता असल्याचं पुढं आलं. त्यामुळं सर्व प्रकरणाची ईडीमार्फत (ED) चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधकांकडून होतेय. दरम्यान, आता शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) कराडच्या या सर्व प्रकरणांची ईडीकडून (ED) चौकशी करावी, अशी मागणी केली.
केज नगरपालिकेचा कराडला ‘दे धक्का’; पवारांच्या खासदाराने घेतलेल्या हरकतीनंतर प्रमाणपत्र रद्द
सुप्रिया सुळेंनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी सुळे म्हणाल्या की, वाल्मिक कराडवर मकोका लावला याबद्दल सरकारचे अभिनंदन. देर याये दुरूस्त आये. पण खंडणीचे प्रकार थांबायला हवे. असेच होत राहिले तर राज्यात गुंतवणूक कशी येईल?, असा सवाल त्यांनी केला. संतोष देशमुख आणि परभणी घटनेतील दोघांना न्याय मिळाला पाहिजे. या प्रकरणात जे कोणी सहभागी असतील त्यांना फाशी झाली पाहिजे, असंही सुळे म्हणाल्या.
‘दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टर मधून…’, विनोद तावडेंचा शरद पवारांवर हल्लाबोल
पुढं बोलतांना सुळे म्हणाल्या की, वाल्मिकी कराड याच्या मालमत्तेबद्दल दररोज वेगवेगळी माहिती बाहेर येत आहे. त्यामुळे वाल्मिकी कराडचे किती अकाऊंड सील केले आणि त्यात किती पैसे होते? याची माहिती समोर येणं आवश्यक आहे. यापूर्वी, ऐकीव माहितीवर ईडीने अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ आणि इतर नेत्यांवर ईडी लावली. मात्र, वाल्मिकी कराडवर गुन्हा नोंद असूनही ईडी का लावली जात नाहीये? असा सवा सुळेंनी उपस्थित केला आहे.
वाल्मिकी कराडने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत आपण शेतकऱ्यांकडून तक्रारीची माहिती घेणार आहे. शेतकऱ्यांची फसवणूक अशा प्रकारे होत असेल तर हे गंभीर आहे. वाल्मिकी कराड याच्यावरील आरोप गंभीर असून मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून कारवाई करावी. मी मुख्यमंत्र्यांची संपर्क करून कारवाईची मागणी करणार असल्याचं सुळेंनी सांगितलं.
काल परळीमध्ये हिंसाचार झाला. टायर जाळले गेले, आंदोलन झाले त्यावेळी पोलीस काय करत होते? असा सवालही सुळेंनी उपस्थित केला आहे.