केज नगरपालिकेचा कराडला ‘दे धक्का’; पवारांच्या खासदाराने घेतलेल्या हरकतीनंतर प्रमाणपत्र रद्द
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेल्या वाल्मिक कराडला (Walmik Karad) आणखी एक धक्का बसला आहे.केजमध्ये वाईन शॉप सुरु करण्यासाठी दिलेलं प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे. शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे (Bajrang Sonawane) यांनी घेतलेल्या हरकतीनंतर कराडला हा दणका मिळाला असून, केज नगरपंचायतीकडून कराडला दिलेलं ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे.
प्रेमभंग, बेरोजगारी की नैराश्य? कुंभमेळ्यातील IIT पासआऊट अभय सिंहची कहाणी
24 तासात तीन धक्के
हत्येचा कट रचल्याप्रकरणी सीआयडीने वाल्मिक कराडवर मकोका अंतगर्त कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. तर, पिंपरी-चिंचवडमधील उच्चभ्रू सोसायटीत वाल्मिक कराडने मालमत्ता कर थकवल्याचा प्रकारही समोर आला आहे. त्यामुळे लवकरच ही मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बीड प्रकरणात सुरेश धसांची भूमिका हवालदाराची; सदावर्तेंनी फोडलं नव्या वादाला तोंड
बजरंग सोनावणेंनी काय घेतली होती हकरत?
शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी कराडने केज शहरामध्ये एक वाईन शॉप विकत घेतले होते. मात्र, हे वाईन शॉप विकत घेताना बेकायदेशीररित्या केज नगरपंचायतकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप सोनावणेंनी करत हरकरत घेतली होती. सोनावणेंच्या या हरकतीवरून अखेर केज नगरपंचायतीने कराडला वाईन शॉपच्या परवान्यासाठी दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द करत कराडला दणका दिला आहे. त्यामुळे गेल्या 24 तासात वाल्मिकला पाठोपाठ तिसरा धक्का बसला आहे.