Suresh Dhas on Mahadeo Munde murder case : बीड (Beed) पोलिसांनी परळीत मतदानाच्या दिवशी माधव जाधव यांनाही मारहाण झाली होती. याप्रकरणी तब्बल 82 दिवसांनी अखेर कैलास फड त्याचा मुलगा निखील फड आणि इतर पाच जणांवर गुन्हा दाखल केला. त्यावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर टीका केली. त्याचबरोबर त्यांनी यावेळी महादेव मुंडे हत्येशी देखील त्यांचा संबंध असल्याचा दावा केला आहे.
यावेळी बोलताना धस म्हणाले की, बीडमधील महादेव मुंडे यांच्या पत्नी त्या माऊली उपोषणाला बसल्या असतील तर एसपींना माझी विनंती आहे. की, अशी वेळ यायला नको. ही आमच्यासाठी लज्जास्पद बाब आहे. या हत्येला 15 महिने झाले आहेत. हे मारेकरी सापडलेच पाहिजे हत्येमध्ये आकाचा 100 टक्के आकाचा संबंध आहे. असं म्हणत धसांनी पुन्हा एकदा मोठा दावा करत धनंजय मुंडेंवर टीका केली.
महाराष्ट्रात काँग्रेसची कमान कोणाकडे? अध्यक्षपदासाठी ‘या’ नावांची चर्चा
दरम्यान धस यांच्या या दाव्यानंतर वाल्मिक कराड याचा मुलगा सुशील कराडही गोत्यात येण्याची शक्यता आहे. सुशील कराड याच्यावर यापूर्वीच मॅनेजरच्या घरात घुसून त्याला मारहाण करत त्याच्या अल्पवयीन मुलीला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याचबरोबर बंदुकीचा धाक दाखवून दोन बल्कर, दोन कार तसेच सोने आणि प्लॉट बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सुशील वाल्मीक कराडसह त्याचे मित्र अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार यांच्यावर हा आरोप आहे. अद्याप या प्रकरणातही गुन्हा दाखल झालेला नाही.
महादेव मुंडे हत्येशी 100 टक्के आकाचा संबंध; सुरेश धसांचा आणखी एक मोठा दावा
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणी सगळ्या घडामोडी एका बाजूला घडत असतानाच हे प्रकरण राज्यभर चर्चेत आणणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस यांनी आणखी एका खून प्रकरणाला हात घातला आहे. या हत्या प्रकरणातील सर्व आरोपी फरार आहेत. मात्र हे सगळे आरोपी वाल्मिक कराड अर्थात आकाच्या मुलाभोवती फिरत असतात असा आरोप धस यांनी केला आहे. त्यामुळे कराड पाठोपाठ त्याचा मुलगाही गोत्यात येण्याची शक्यता आहे.