घृणास्पद..! गुंगीचं औषध देऊन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, ठाकरेंच्या खासदाराच्या शाळेत धक्कादायक प्रकार
![घृणास्पद..! गुंगीचं औषध देऊन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, ठाकरेंच्या खासदाराच्या शाळेत धक्कादायक प्रकार घृणास्पद..! गुंगीचं औषध देऊन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, ठाकरेंच्या खासदाराच्या शाळेत धक्कादायक प्रकार](https://images.letsupp.com/wp-content/uploads/2025/02/Nanded-Crime_V_jpg--1280x720-4g.webp)
Nanded Crime : ठाकरे गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil Ashtikar) यांच्या शाळेतील मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचं समोर आलंय. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा येथे हा प्रकार घडला. विद्यार्थिनीच्या गर्भपातानंतर ही घटना उघडकीस आली. दरम्यान, याप्रकरणी तामसा पोलीस ठाण्यात (Nanded Police) मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात काँग्रेसची कमान कोणाकडे? अध्यक्षपदासाठी ‘या’ नावांची चर्चा
खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची हदगाव तालुक्यातील तामसा येथे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आहे. आरोपी राजू सिंग चौहान हा या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. याच शाळेत एक विद्यार्थींनी दहावीत शिकत होती. तुमची मुलगी हुशार आहे, तिला पोलीस अॅकेडमीध्ये भरती करतो, असं पालकांना सांगितलं. त्यानंतर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, मुख्याध्यापकाने पीडित मुलीला नांदेड येथील पोलिस प्रशिक्षण केंद्र दाखवतो म्हणून तिला आपल्या चारचाकी वाहनातून नेले आणि गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. तसेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार सुरूच ठेवले, यातून मुलगी गरोदर राहिली. त्यामुळं मुख्याध्यापकानेचे मुलीचा गर्भपात केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
महादेव मुंडे हत्येशी 100 टक्के आकाचा संबंध; सुरेश धसांचा आणखी एक मोठा दावा
दरम्यान, मुलीच्या कुटुंबाला हा प्रकार कळताच त्यांनी तामसा पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे, त्यानंतर मुख्याध्यापक फरार झाला असून त्याच्यावर पोस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खासदारांची प्रतिक्रिया
दरम्यान, खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आरोपी मुख्याध्यापक राजू सिंग चौहान याला माझे पाठबळ नाही, ही घटना समजल्यानंतर आपण त्याला ९ तारखेला निलंबित केलंय, असं स्पष्टीकरण आष्टीकर यांनी दिलं. आरोपींवर कठोर कारवाई कऱण्याची मागणी आपण पोलिसांकडे केल्याचं आष्टीकर म्हणाले. मी अशी घटना खपवून घेणार नाही. नराधमाला शिक्षा व्हायला पाहिजे, असंही ते म्हणाले.
घटनेच्या निषेधार्थ तामसा कडकडीत बंद
शाळेतील मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थ्यीनींवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेबाबत सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ तामसा शहरात नागरिक आणि व्यापाऱ्यांनी कडक बंद पाळला. नागरिकांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. आरोपींना तात्काळ अटक करावी, गर्भपात करणाऱ्या डॉक्टरवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.