Suresh Dhas : मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणावरून राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. आज या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करण्यात यावी या मागणीसाठी बीडमध्ये (Beed) मूक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्च्यात बोलताना भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी जोरदार फटकेबाजी करत मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे बोगस मतांमुळे निवडणून आले असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.
या मोर्च्यात बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने साधी मुंगी मारण्याची परवानगी दिली नाही. संतोष देशमुख तीन टर्मचा सरपंच होता. पण त्याला क्रूरतेनं मारलं. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. ही पद्धत चुकीची आहे. मी 80 हजार मतांनी निवडणून आलो मात्र धनु भाऊ तुम्ही 1 लाख 42 हजार मतांनी निवडणून आले 330 बुथांपैकी 230 बुथा ताब्यात असतील तर हेच होणार. तुम्ही बोगस मतांनी जिंकून आले आहे असा आरोप देखील यावेळी बोलताना सुरेश धस यांनी केला.
गोली मार भेजे में, भेजा जो करता हें असं गाणं सत्या पिक्चरमध्ये आहे मात्र बीड जिल्ह्यात गोली मार किधर भी हो गया. जिल्ह्यात1200-1300 लायसन्स ज्या जिल्ह्याधिकारींनी दिले आणि ज्या पोलीसअधीक्षकांनी त्याला समर्थन दिले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. असेही आमदार सुरेश धस म्हणाले. तसेच या प्रकरणातील मुख्य आका लवकरात लवकर पकडला गेला पाहिजे. अशी मागणी देखील त्यांनी केली.
तर यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर देखील टीका करत तुम्ही आतापर्यंत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी त्यांचे घरी का गेले नाही असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
यावेळी ते म्हणाले की, पंकूताई माझा सवाल आहे. तुम्ही संभाजीनगर एअरपोर्टला उतरला. 12 डिसेंबर गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचा दिवस आहे मात्र तुम्ही वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का नाही गेला? असा सवाल आहे माझा असं सुरेश धस म्हणाले.
मोठी बातमी! अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना चिरडलं, एकाचा मृत्यू
तसेच पंकजा मुंडे तुम्हाला चांगली माणसं कळत नाहीत. तुम्हाला फक्त जी हुजूर जी हुजूर करणारी माणसं पाहिजेत. असा टोला देखील त्यांनी यावेळी पंकजा मुंडे यांना लावला.