Download App

महंत नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण; सुरेश धस यांची एका वाक्यात प्रतिक्रिया

धनंजय मुंडे भगवान गडाच्या आश्रयाला गेले होते. गुरुवारी रात्री पहिल्यांदाच अहमदनगर जिल्ह्यातील भगावानगडावर मुक्कामी गेले.

  • Written By: Last Updated:

Suresh Dhas on Namdev Shastri Maharaj : संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीडच वातावरण प्रचंड तापलं असून, तिथलं राजकारणही ढवळून निघालं आहे. या हत्येमागे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा आरोप गेल्या अनेक दिवसांपासून सत्ताधारी पक्षातील काही (Suresh Dhas) नेत्यांसह विरोधकांकडूनही केला जात आहे. यावर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली. त्यावरुन मोठा वाद निर्माण झालाय. त्याबद्दल आता आमदार सुरेश धस यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.

आरोपींची मानसिकता समजून घ्या, नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले

मी भगवान बाबांच्या गादीचा आणि नामदेव शास्त्रींचा आदर करतो, अधिक बोलण्यास नकार देत सुरेश धसांनी बचावात्मक भुमिका घेतली आहे. दरम्यान, बीड प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक बदनाम केले जात असल्याचा महंत श्री नामदेव शास्त्री महाराज यांनी म्हटल आहे. यामध्ये समाजाच्या आडून मोठं राजकारण होत आहे असं महंत म्हणाले आहेत.

त्याचबरोबर काही राजकीय नेते जाणीवपूर्वक या प्रकरणाच्या आडून धनंजय मुंडे यांना बदनाम करत आहेत. मात्र, यांच्या राजकारणामुळे समाजामध्ये मोठी तेढ निर्माण होत आहे याचेही भान या राज्यकर्त्यांनी ठेवलं पाहिजे. धनंजय मुंडे यांना आम्ही अनेक दिवसापासून ओळखतो त्यामुळे तो असं वागणार नाही असंही महंत म्हणाले आहेत.

भगवान गड पुन्हा चर्चेत

धनंजय मुंडे भगवान गडाच्या आश्रयाला गेले होते. गुरुवारी रात्री पहिल्यांदाच अहमदनगर जिल्ह्यातील भगावानगडावर मुक्कामी गेले. त्यामुळे गेल्याकाही वर्षांपासून राजकारणापासून दूर असलेला भगवान गड पुन्हा चर्चेत आलेला आहे. गेली अनेक दिवसांपासू पंकजा मुंडे यांच्यावरून हा गड चर्चेत होता. त्यानंतर तेथील राजकीय भाष्य बंद झालं होत. परंतु, आता पुन्हा एकदा हे राजकारण सुरू झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

follow us