Suresh Dhas : संतोष देशमुख यांच्या हत्या करतानाचे फोटो व्हायरल झाल्यानं महाराष्ट्र सुन्न झाला आहे. यानंतर या प्रकरणात शेवटपर्यंत लढा देणारे आमदार सुरेश धस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Suresh Dhas) यासंदर्भात ट्विट करुन त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. फोटो समोर आल्यानंतर देशमुख कुटुंबियांचा आक्रोश असह्य होतोय असंही त्यांनी म्हटलं आहे.
सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. आरोपींनी त्यांची हैवानियत दाखवत संतोष देशमुख यांच्या मृतदेहासमोर जल्लोष केला. त्याचे फोटो व्हिडिओ बाहेर आले. माणुसकीला काळीमा फासणारी आणि बघता क्षणी डोळ्यात अश्रू आणणारी ही घटना आहे. काल आरोपींच्या या कृत्याचे काही फोटो समोर आले आणि अख्खा महाराष्ट्र हादरून गेला. संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या झाली हे विकृतीचं लक्षण आहे. ही क्रूर मानसिकता आपल्याला लवकरच ठेचावी लागेल.
धनंजय मुंडेंचा गेम ओव्हर? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा देण्याचा आदेश!