Download App

सुषमा अंधारेंचं भाकीत एकनाथ शिंदेंची झोप उडविणारे…भाजप काही तासांतच दुसरा सीएम नेमणार!

सत्तासंघर्षाचा निकाल जवळ आलेला असतानाच त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बदलले जातील अशी राजकीय चर्चा सुरु आहे. त्यात महाविकास आघाडीकडूनही एकनाथ शिंदे बदलले जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. आता ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे भाजप काही तासांतच दुसरा मुख्यमंत्री नेमणार असल्याचं विधान केलं आहे. सुषमा अंधारेंनी हे विधान करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झोप उडवली आहे.

‘DRDO’चे संचालक कुरुलकर यांना १५ मेपर्यंत एटीएस कोठडीत ठेवण्याचे आदेश

राज्यात सध्या सत्तासंघर्षाचा निकाल लागणार असल्याच्या चर्चांना उत आलेला असतानाच सुषमा अंधारेंच्या भाकीतमुळे मुख्यमंत्री शिंदेंची झोप उडालीय. तसेच राज्यात 11 ते 13 मेदरम्यान उलथापालथ होणार असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे.

Adipurush Trailer : ‘ये कहानी है रामायण की’; आदिपुरुष चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

सुषमा अंधारे म्हणाल्या, आपल्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा झाला तर मंत्रिमंडळाच्या राजीनामा होईल. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काहीही करुन सरकार पडू द्यायचं नाही. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरण्याआधीच दुसरा कोणी मुख्यमंत्रिपदी बसवावा.

पवारांकडून चव्हाणांचा पाणउतारा; म्हणाले, त्यांची पक्षात काय जागा ते आधी तपासावं

त्याआधीच मुख्यमंत्री शिंदे यांना डिगनीफाईट एक्झिट मिळणार. कदाचित ही एक्झिट सदस्यांच्या मृत्यूला कारणीभूतही ठरु शकते कारणं दाखवायला ते काहीही कारणं दाखवणार असल्याचं सुषमा अंधारेंनी सांगितलंय. त्यामुळेच राज्यात 11 ते 13 मे दरम्यान उलथापालथ होणार असल्याचं भाकीत त्यांनी केलंय.

दरम्यान, मागील वर्षी जून महिन्यापासून राज्यात सत्तासंघर्ष सुरु आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेत मोठे बंड झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना सत्ता सोडावी लागली. तेव्हापासून राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. पाच सदस्यांच्या घटनापीठासमोर राज्याच्या सत्ता संघर्षाची सुनावणी सुरु होती. अखेर आता सर्वोच्च न्यायालयात सत्ता संघर्षाचा निकाल लवकरच लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Tags

follow us