पवारांकडून चव्हाणांचा पाणउतारा; म्हणाले, त्यांची पक्षात काय जागा ते आधी तपासावं
Sharad Pawar On Prithviraj Chavan : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये विविध कारणांवरुन धुसफूस दिसून येत आहे. यामध्ये आता पुन्हा भर पडली आहे. काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर शरद पवारांनी त्यांना टोला लगावला आहे. तर सामनाच्या अग्रलेखाला महत्व देत नसल्याचे विधानदेखील त्यांनी केले होते. यावरुन आता महाविकास आघाडीमध्ये सुंदोपसुंदी सुरु झाल्याचे दिसून येत आहे.
काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचा प्लॅन बी सुरु असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता शरद पवारांनी त्यांच्या या वक्तव्यावर उत्तर दिले आहे. काही लोकांची पक्की मतं असतात. ती पक्की मतं असणाऱ्यांपैकी ज्यांचं नाव आपण घेतलं ते गृहस्थ आहेत. त्यांचं पक्कं मत असं असतं की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आजपर्यंत प्रत्येकवेळी मत व्यक्त करण्याचा प्रश्न आला की, त्यांचं मत आमच्याबाबत प्रतिकूल असतं. त्यामुळे आम्ही त्यांची गांभीर्याने नोंद घेत नाही आणि लोक किती गांभीर्याने घेतात ते माहित नाही असे शरद पवार म्हणाले आहेत.
मोठी कारवाई! पुण्यात तीन कोटीहून अधिकची रोकड जप्त
तसेच साताऱ्यामध्ये शरद पवारांना पृथ्वीराज चव्हाणांविषयी विचारले असता, चव्हाणांची पक्षात काय जागा आहे, ते आधी तपासावं, असा टोला लगावला आहे. त्यांनी त्यांच्या पक्षात काय स्थान आहे. ते ए आहेत, की बी आहेत, की सी आहेत, की डी आहे ते आधी तपासावं. त्यांच्या पक्षातल्या इतर सहकाऱ्यांना विचारलं की यांची कॅटेगरी कोणती आहे, तर ते तुम्हाला खासगीत सांगतील. जाहीर नाही सांगणार, अशा शब्दात पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांना टोला लगावला आहे.
Khargone Bus Accident : मध्यप्रदेशात मोठा अपघात; 50 फूट नदीत बस कोसळली, 15 जणांचा मृत्यू
दरम्यान, यामुळे आता काँग्रेसमधील कोणता नेता प्रतिक्रिया देतो, ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याआधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टिप्पणी केली होती. तेव्हा पवारांनी त्यांनादेखील फटकारले होते. आता यावर काँग्रेसमधून काय प्रतिक्रिया येते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.